Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा

Mallikarjun Kharge PM Modi Remarks: काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत वडिलांबद्दल केलेल्या अपमानजनक, असभ्य आणि आक्षेपार्ह वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून, भाजप सोमवारी देशभरातील आपल्या सर्व राज्य मुख्यालयांवर तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 26, 2026 | 10:52 AM
Mallikarjun Kharge PM Modi Remarks, Kharge Modi Ka Baap Bhi Jayega,

Mallikarjun Kharge PM Modi Remarks, Kharge Modi Ka Baap Bhi Jayega,

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे नव्या राजकीय वादाची ठिणगी
  • भाजपने सोमवारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात देशभरात आंदोलनाची घोषणा
  • पाटणा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल
Congress-BJP Controversy: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge) यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. रविवारी पाटना येथील एका जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर एका व्यक्तीने आक्षेप घेतल्याने मोठा गदारोळ झाला. त्यावर खर्गे यांनी, “मोदी का बाप भी जाएगा ,” असे उत्तर दिले.

या वक्तव्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नाव राजकीय वाद निर्माण झाला आहे. ही घटना बापू सभागृहात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घडली. मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्र सरकार, भाजप आणि आरएसएस यांच्यावर टिका करत असताना ही सर्व घटना घडली.

Maharashtra Weather Forecast: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ; विदर्भासह मराठवाडा आणि घाट परिसरात पावसाची

खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल

यावेळी, ‘मोदी कुठेही जाणार नाहीत’ असे म्हणत एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यावर “”मोदी का बाप भी जाएगा” असे म्हणत खर्गेंनी त्या संबंधित व्यक्तीला प्रत्युत्तर दिले आहे. पाटणाच्या कोतवाली पोलीस ठाण्यात खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी सर्व शिष्टाचार मोडला – अमित शाह

दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदींच्या वडिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून खर्गे यांनी राजकारणातील सर्व शिष्टाचाराचे उल्लंघन केले आहे. काँग्रेस पक्षाने मोदी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी त्यांच्या आईबद्दलही अपमानास्पद भाषा वापरली आहे. काँग्रेस पक्ष दररोज असभ्यतेच्या मर्यादा ओलांडत आहे. काँग्रेस नेतृत्व राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन करत आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही ठोस धोरणे शिल्लक नाहीत.

Government Salary & Grade Pay: सरकारी नोकरीत ”ग्रेड-पे’चा अर्थ काय? जाणून घ्या बेसिक सॅलरी आ

भाजप खर्गे यांचा पुतळा जाळणार

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनांसंदर्भात एका निवेदनात भाजपने म्हटले आहे की, “काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत वडिलांबद्दल केलेल्या अपमानजनक, असभ्य आणि आक्षेपार्ह वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून, भाजप सोमवारी देशभरातील आपल्या सर्व राज्य मुख्यालयांवर तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. भाजपने सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा जाळण्याची घोषणा केली आहे. पक्ष २६ ऑक्टोबर रोजी सकाळी पाटण्यातील आयकर मंडळावरही खर्गे यांचा पुतळा जाळणार आहे.

निवडणुका मतपत्रिकेद्वारेच व्हायला हव्यात

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला पकडून मारहाण केली. खर्गे यांच्या भाषणात, वादग्रस्त वक्तव्यांव्यतिरिक्त, निवडणूक प्रक्रिया आणि केंद्र सरकारसंदर्भात अनेक राजकीय मुद्देही उपस्थित केले. त्यांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आणि भाजपवर निवडणूक अनियमिततेचा आरोप केला. पुढील ३० वर्षे काँग्रेस सत्तेत येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ३० वर्षांनंतर कोण जिवंत असेल, असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला आणि अशी विधाने लोकांची दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले.

#WATCH | A ruckus broke out during Congress national president Mallikarjun Kharge’s address at the 139th birth anniversary celebration of Dr. Shri Krishna Singh in Patna, Bihar A person present at the event said that PM Modi would not go anywhere, Kharge responded, “Modi ka baap bhi jayega.” — ANI (@ANI) October 25, 2026

 

Web Title: National mallikarjun kharge pm modi remarks bjp nationwide protest as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Congress
  • Mallikarjun Kharge
  • narendra modi
  • National Politics

संबंधित बातम्या

Congress Voter Campaign : १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक! भरतसिंह सोलंकींची देशव्यापी मोहिमेची घोषणा
1

Congress Voter Campaign : १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक! भरतसिंह सोलंकींची देशव्यापी मोहिमेची घोषणा

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
2

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’
3

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण
4

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.