Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Public Sector Banks For Gen Z : Gen Z साठी Cool बनणार सरकारी बँका, पण कशा? वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केला मास्टर प्लॅन…

Public Sector Banks For Gen Z : केंद्रीय वित्तमंत्र्यांनी बँकांना तरुण पिढीच्या गरजांनुसार आधुनिक व सोपे बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी बँका तरुणांना जोडण्यासाठी नक्की काय बदल करणार आहेत, याबाबत नेमका काय मास्टरप्लॅन आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 19, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Gen Z साठी Cool बनणार सरकारी बँका
  • वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केला मास्टर प्लॅन…
  • तरुणांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा
Public Sector Banks For Gen Z : तंत्रज्ञानप्रेमी आणि नव्या विचारांच्या Gen Z ला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता सरकारी बँका आपला जुना डिपीकल अंदाज बदलणार आहे. आपलं जुने रूपडं बदलून अधिक ‘कूल’ आणि डिजिटल बनण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहेत. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका या तरुणांसाठी अनुकूल बनवण्यासाठी त्यात परिवर्तन घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. देश प्रगत आणि पुढची पिढी असलेल्या तरुण लोकसंख्येसाठी एक मजबूत आर्थिक परिसंस्था निर्माण करत असल्याचा प्लॅन आहे. यामध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत? सार्वजनिक बँका कूल होतील म्हणजे नेमके कोणते बदल केले जातील? ( Public Sector Banks For Gen Z ) 

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांची पारंपरिक प्रतिमा बदलून ‘कूल’ आणि ‘जनरेशन झेड’साठी आकर्षक बनण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून ही नवीन पिढी खाजगी बँकांपेक्षा सरकारी बँकांना प्राधान्य देईल.

बँकांनी तरुण ग्राहकांशी स्वतःच संपर्क साधावा

नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय PSB कॉन्फ्लुएन्सच्या अंतिम सत्राला संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २ ऑक्टोबरपासून महिनाभर चालणारी ‘बँकिंग फॉर यूथ’ मोहीम सुरू करण्याचे आवाहन केलं आहे. देशातील तरुणांमध्ये एक ‘कूल’ प्रतिमा निर्माण करणं, तसेच बँकिंग व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सावधगिरी कायम राखणं, हा या मोहिमेचा उद्देश आहे. बँकांना सूचना देण्यात आली आहे की, तरुणांनी त्यांच्या बँकेत येण्याची वाट न पाहता, महाविद्यालये, विद्यापीठे आणि कौशल्य विकास केंद्रांना भेट देऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधून आपण त्यांच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. त्यामुळे तरुण सार्वजनिक बँकांशी जोडले जाऊन त्यांच्यासोबत एक वेगळा बाँड तयार होण्याचा प्रयत्न करावा.

A banking relationship established between ages 16 and 18 can deepen over decades as a young person moves through education, employment, entrepreneurship, home ownership, investment and wealth creation. Public Sector Banks must be the first and most trusted choice of young… https://t.co/jSH37eoVlG — Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) August 18, 2026

सार्वजनिक क्षेत्रातील बँका स्वतःला बनवणार कूल

या उपक्रमाचा उद्देश केवळ खाती उघडून सहभाग नोंदवावा इतपर्यंत मर्यादित नाही तर तरुणांशी कॅम्पसपासून करिअरपर्यंत आणि त्यापलीकडेही एक मजबूत लॉंगटर्म नाते निर्माण करणे हा आहे. सीतारामन म्हणाल्या की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची प्रतिमा अजूनही “सरकारी बँका” अशीच आहे आणि तरुण ग्राहकांना त्या अनेकदा खाजगी बँकांपेक्षा कमी आकर्षक वाटतात. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तरुणांशी थेट संवाद साधण्याचे आणि त्यांच्या बँकांकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेण्याचे आवाहन केले. सार्वजनिक बँकांची प्रणाली यांस कारण असल्याने त्यांची कामाची शैली बदलणं अपेक्षित आहे.

सीतारामन म्हणाल्या, “सार्वजनिक क्षेत्रातील बँका तरुण भारतीयांसाठी पहिली आणि सर्वात विश्वासार्ह निवड असायला हव्यात.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, बँकांनी तरुणांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर, जसे की त्यांचे पहिले खाते, पहिला पगार, उच्च शिक्षण, उद्योजकता आणि पहिली गुंतवणूक या सगळ्या प्रवासात सार्वजनिक बँका त्यांच्यासोबत असायला हव्यात. बँका नामांकित शैक्षणिक संस्था आणि प्लॅटफॉर्मसोबत सहयोग करून शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे तरुण ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी विनामूल्य ऑनलाइन शिक्षण सामग्री देखील प्रदान करू शकतात.

तरुणांसाठी समर्पित सेवा

सीतारामन यांनी बँक शाखांमध्ये तरुणांसाठी विशेष “युवा किऑस्क” किंवा “युवा बँकिंग मित्र” स्थापन करण्याचे आवाहनही केले आहे. या व्यवस्थेमुळे तरुणांना बँकिंग आणि आर्थिक उत्पादने कोणत्याही संकोचाशिवाय समजून घेण्यास मदत होईल. या सगळ्यामुळे सार्वजनिक बँकची छबी असलेली सरकारी बँक ही फक्त ओळख न राहता त्यांना हा बँड आपलासा वाटेल.

Govt Subsidy For Business : मागास जिल्ह्यांमध्ये बिझनेस सुरू करा अन् मिळवा सरकारी मदत! कर्मचारी भरतीसाठीही मिळणार अनुदान

Web Title: Public sector banks for gen z will become cool finance minister plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Bank
  • Bank of India
  • FM Nirmala Sitharaman
  • Gen Z
  • Nirmala Sitaraman
  • SBI

संबंधित बातम्या

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
1

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
3

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.