Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : पॅरिसची लाखोंची ऑफर नाकारली… भारतात येऊन सुरु केला व्यवसाय आता महिन्याला कमावताहेत तब्बल 400000 रुपये

Success Story : परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेले किंवा तिथे मोठ्या पगाराची नोकरी मिळालेले अनेक तरुण स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, पॅरिसमधील मोठ्या पॅकेजची आणि आलिशान आयुष्याची संधी नाकारून एका भारतीय तरुणाने स्वदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 12, 2026 | 01:49 PM
भारतात येऊन सुरु केला व्यवसाय ( सौजन्य - chatgpt )

भारतात येऊन सुरु केला व्यवसाय ( सौजन्य - chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • पॅरिसची लाखोंची ऑफर नाकारली…
  • भारतात येऊन सुरु केला व्यवसाय
  • आता महिन्याला कमावताहेत तब्बल 400000 रुपये
Success Story : आयुष्यात उदरनिर्वाहासाठी माणून नोकरी व्यवसाय करतो. कोणत्या पर्याय निवडायचा हा प्रश्न प्रत्येकाचा मनात असतो. पण योग्य पर्याय निवडला तर आपलं आयुष्य बनू शकतं. असंच काहीसं उदाहरण या स्टोरीतून मिळतं. शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. तिथे उच्च शिक्षण घेतलं. नोकरीच्या मोठ्या मोठ्या संधीही मिळाल्या पण त्या संधीला ठोकर मारुन परत स्वदेशात परतून स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची हिंमत प्रत्येकात नसेत मात्र बंगळुरुच्या पृथ्वीराज यांनी करुन दाखवलं. नेमका कसा होता त्यांचा प्रवास आणि त्यांनी कसा सुरु केला व्यवसाय सविस्तर जाणून घेऊयात. ( Success Story ) 

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

पॅरिसमधील मोठी सॅलरी जॉबला नकार

शिक्षणानंतर गडगंज पगाराची नोकरी आणि राहायला आलिशान घर असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र पृथ्वीराज यांच्या मनात काही वेगळंच होतं. बंगळुरुचे मुळचे पृथ्वीराज पॅरिसमध्ये शिक्षणासाठी होते. तिथे त्यांना नोकरीच्या मोठ्या मोठ्या ऑफर्स आल्या पण त्यांना या ऑफर्स स्विकारल्या नाहीत. कोणीही सहज घेऊन न शकणारा असा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला ते पॅरिसमधील शिक्षण पूर्ण करुन भारतात परतले.

भारतात येऊन सुरु केला व्यवसाय

परदेशातील इतकी मोठी संधी सोडून भारतात येण्याचा निर्णय काही सोपा नव्हता. फ्रान्समधील बहुचर्चित SKEMA बिजनेस स्कूलमधून इंटर्ननॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. फ्रांन्समधून डिग्रीपूर्ण केल्यानंतर त्यांना बऱ्याच मोठ्या मोठ्या पॅकेजचे जॉब ऑफर आले. पण त्यांनी भारतात येण्याचा मोठा निर्णय घेतला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. भारतात येवून कुटुंबाची पोल्ट्री शेडला मशरुमच्या शेतीत रुपांतर केलं. इथून सुरु झाला व्यवसायाचा प्रवास.

स्वतःचा बंद पडलेल्या व्यवसायाला पून्हा उभारी

बंगळुरु मधील त्यांच्या देवनाहल्लीमधील गावांत पूर्वी त्यांची स्वतःची पोल्ट्री होती. काही कारणास्तव आणि वाईट काळामुळे हा व्यवसाय 2019 ला बंद पडलेला. पण त्यांना पुन्हा उभारी घेण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर त्यांनी मशरुम शेती करण्याचा विचार केला. सुरुवात अगदी लहानापासून केली. व्यवसाय करायचा म्हणून थेट मोठी गुंतवणूक आणि मोठा प्लॅन न करता. त्यांनी 10 पिशव्यांपासून सुरुवात केली. या शेतीसाठी त्यांनी बटन मशरुमऐवजी ऑयस्टर मशरुमची निवड केली. कारण या मशरुमची एक खासियत आहे. हे उत्पादनासाठी फार सोपे असतात. आणि त्याची प्रक्रियादेखील बरीच सहज असते.

2025 पासून सुरुवात

व्यवसाय करायचा तर त्याला फॅन्सीपणा न आणता आणि मोठं भांडवल न गुंतवता अगदी सहज आणि सोपा पर्याय निवडला. जानेवारी 2025 मध्ये 180 रुपये 2 किलो स्पॉन आणि फ्री मिळणाऱ्या धान्यापासून फक्त 10 बॅगपासून सुरुवात केली. हा प्रायोगित प्रोजेक्ट होता. उत्पादन केलेले मशरुम मित्र आणि नातेवाईकांना वाटले. त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या आणि पुढे त्यात बदल केला. त्रुटी लक्षात घेऊन त्यात बदल केला आणि 6 मार्च 2025 से कमर्शियल उत्पादन सुरु केलं.

आता 4 लाख रुपयांची कमाई

25 बॅग पासून सुरुवात केल्यानंतर आता हा व्यवसाय 4000 बॅगच्या सेटअपपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये वेगवेगळे चरण आहेत. त्यांच्यावर विशेष लक्ष्य देवून त्यांना आपल्या चुकातून शिकत सुधारणा केली. आता ते दर दिवशी दर दिवशी 45 किलो उत्पादन घेतात जे संपूर्ण महिन्याला 1350 किलो मशरुमचं उत्पादन घेतलं जातं. 320 किलो दराने प्रति महिना 4 लाख रुपयांची कमाई होते. त्याच्या उत्पादनाला आता डिमांडही तितकीच मोठी वाढली आहे. स्थानिक बाजार, सुपरमार्केट,जेप्टो सारख्या क्विक डिलिवरी कंपन्यांमधून मोठी मागणी आहे.

फक्त इथेच थांबले नाहीत

मशरुमच्या शेतीपुरतेच थांबले नाहीत तर त्यांनी या उद्योगातून निर्माण होणाऱ्या अवशेषांचा चांगला वापर केला. त्यातून त्यांनी वर्मीकंपोस्टींगची सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी ही कला इतरांना शिकवायला सुरुवात करत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे फक्त फ्रन्समध्ये गडगंज पगाराच्या विळख्यात न अडकता भारतात परतून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.

Mutual Fund गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर काय? पैशांवर राहणार कोणाचा हक्क? SEBI चे नियम काय सांगतात?

Web Title: Rejected paris job started success business in india earning 4 lakhs monthly ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Farmers Success Story

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….
1

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.