Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

25 वर्षांत जे झालं नाही ते आता घडतंय…! रशिया गोल्ड रिझर्व्हमधून सोन्याची धडाधड विक्री का करतंय?

गेल्या अडीच दशकांपासून सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देणारा रशिया आता अचानक सोने विकू लागला आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या सोन्याच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली आहे. अशी घटना 25 वर्षांत पहिल्यांदा..

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 05:17 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देणारा रशिया
  • रशिया अचानक सोने विकू लागला
  • रशिया सोन्याची विक्री का करतंय?
Russia Gold Reserve : गेल्या अडीच दशकांपासून सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देणारा रशिया आता अचानक सोने विकू लागला आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या सोन्याच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली आहे. अशी घटना गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच घडत आहे. रशियाने आपल्या मध्यवर्ती बँकेच्या साठ्यातून सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. बर्लिनस्थित वृत्तसंस्था bne IntelliNews यांच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

FASTag News: उत्तरपासून दक्षिणेपर्यंत… नॅशनल हायवेवरील टोल दरात मोठी वाढ! १ एप्रिलपासून ‘या’ राज्यांत प्रवास महागणार

अहवालात काय?

या अहवालानुसार, नियामक आकडेवारी दर्शवते की २०२२ ते २०२५ या कालावधीत, रशियाने १५ ट्रिलियन रुबल म्हणजे १५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि परकीय चलन विकलं आहे. त्यानंतर, २०२६ च्या पहिल्या दोन महिन्यांत ३.५ ट्रिलियन रुबल म्हणजे ३५ अब्ज डॉलर्स इतकी अतिरिक्त विक्री करण्यात आली आहे. केवळ जानेवारी महिन्यातच, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने ३,००,००० औंस सोन्याची विक्री केली आहे आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आणखी २,००,००० औंस सोन्याची विक्री केली.

रशिया सोन्याची विक्री का करतंय?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. परिणामी, लष्करी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. युक्रेनमधील रशियाच्या या संघर्षाचे हे चौथं वर्ष आहे. या वर्षी, रशियाने आपल्या संरक्षण अर्थसंकल्पासाठी विक्रमी रक्कम १४.५ ट्रिलियन रुबलपेक्षा अधिक राखीव ठेवली आहे. ही रक्कम एकूण सरकारी खर्चाच्या अंदाजे ४० टक्के इतकी आहे. केवळ कर महसुलातून या खर्चाची पूर्तता करणे शक्य नाही.
२०२५ मध्ये रशियाची अर्थसंकल्पीय तूट २.६ ते ३.४ टक्क्यांच्या दरम्यान पोहोचली होती; याचे मुख्य कारण म्हणजे, युक्रेनमधील युद्धामुळे अनेक पाश्चात्य राष्ट्रांनी रशियाच्या तेल आणि वायूवर जे देशाच्या महसुलाचे मुख्य स्रोत आहेत त्यांच्यावर विविध निर्बंध लादले आहेत. या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी, रशिया आता आपल्या सुवर्ण साठ्याचा वापर करावा लागत आहे.

रशियाने आपली रणनीती बदलली

यापूर्वी, रशियाची मध्यवर्ती बँक आणि अर्थ मंत्रालय केवळ कागदोपत्री (paper-based) सोन्याचे हस्तांतरण करत होते; मात्र, आता ते आपल्या साठ्यातून प्रत्यक्ष सोन्याच्या लगडी म्हणजेच bullion बाहेर काढले आहे आणि त्यांची खुल्या बाजारात विक्री करत आहेत. या मोठ्या प्रमाणावरील विक्रीचा परिणाम म्हणून, रशियाचा सुवर्ण साठा चार वर्षांतील नीचांकी पातळीवर म्हणजेच ४.३ दशलक्ष औंस इतका पोहोचला आहे. युद्धाच्या चौथ्या वर्षात प्रवेश करत असताना इतक्या वर्षांमध्ये देशावरील आर्थिक दबाव किती तीव्र झाला आहे, हे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.

कोटक महिंद्रा प्राइममध्ये नेतृत्व बदल! सुरज राजप्पन नवे एमडी आणि सीईओ; शाहरुख तोडीवाला ३१ मे रोजी होणार निवृत्त

Web Title: Russia has taken the step of withdrawing gold from its reserves to sell for the first time in 25 years marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Marathi News
  • Russia
  • Russia and Ukraine war

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.