Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! आता गुंतवणुकीवर मिळणार ७.५०% पर्यंत व्याज; जाणून घ्या नवे दर

श्रीराम फायनान्स लिमिटेडने (SFL) २ जुलै २०२६ पासून आपल्या मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरात मोठी वाढ केली आहे. आता ग्राहकांना गुंतवणुकीवर कमाल ७.५०% पर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 05:05 PM
श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! (Photo Credit- X)

श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले!
  • आता गुंतवणुकीवर मिळणार ७.५०% पर्यंत व्याज
  • जाणून घ्या नवे दर
मुंबई (१ जुलै २०२६): श्रीराम ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (SFL) आपल्या विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. हे सुधारित व्याजदर २ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. ठेवींच्या दरातील ही वाढ पाहता, पुढील काळात कर्जाचे व्याजदर घटण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
या मुदत ठेवींना क्रिसिल रेटिंग्सतर्फे “CRISIL AAA/Stable”, इक्राकडून “[ICRA]AAA (Stable)”, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चतर्फे “IND AAA/Stable” आणि केअर रेटिंग्सकडून “CARE AAA/Stable” अशी सर्वोच्च श्रेणी मिळाली आहे.

सुधारित व्याजदर (रु. १० कोटींपर्यंतच्या ठेवींसाठी):

२ जुलै २०२६ पासून लागू होणारे सुधारित वार्षिक व्याजदर खालीलप्रमाणे आहेत:

१२ महिने: जुना दर ६.७५% | सुधारित दर ६.८५%
१५ महिने (केवळ डिजिटल): जुना दर ७.०५% | सुधारित दर ७.१०%
१८ महिने ते २३ महिने: जुना दर ७.००% | सुधारित दर ७.०५%
२४ महिने ते ३५ महिने: जुना दर ७.०५% | सुधारित दर ७.१०%
३६ महिने ते ६० महिने: जुना दर ७.२५% | सुधारित दर ७.५०%

अतिरिक्त फायदे:

जेष्ठ नागरिक: ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना ठेव किंवा नूतनीकरणाच्या वेळी प्रतिवर्ष ०.५०% अतिरिक्त व्याज मिळेल.
महिला ठेवीदार: महिला ठेवीदारांना प्रतिवर्ष ०.०५% अतिरिक्त व्याज दिले जाईल.
नूतनीकरण: मुदत संपलेल्या ठेवींच्या नूतनीकरणावर प्रतिवर्ष ०.१५% अतिरिक्त व्याज मिळेल.
ठेवीची मर्यादा: ठेवी किमान रु. ५,०००/- आणि त्यानंतर रु. १,०००/- च्या पटीत स्वीकारल्या जातील.

Akasa Air : अकासा एअरने राजस्थानमध्ये केला प्रवेश! या नव्या मार्गिकेवरून होणार प्रवास सुरु

फिक्स इन्व्हेस्टमेंट प्लॅन (FIP) – सुधारित दर:

या योजनेचे सुधारित वार्षिक दर २ जुलै २०२६ पासून पुढीलप्रमाणे असतील:
१२ ते २३ महिने: जुना दर ६.७५% | सुधारित दर ६.८५%
२४ ते ३५ महिने: जुना दर ७.०५% | सुधारित दर ७.१०%
३६ ते ४८ महिने: जुना दर ७.२५% | सुधारित दर ७.५०%

FIP चे अतिरिक्त नियम व अटी:

महिला ठेवीदारांना प्रतिवर्ष ०.०५% अतिरिक्त व्याज मिळेल.
फिक्स इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (FIP) इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
FIP चा हप्ता किमान रु. १,०००/- आणि त्यानंतर रु. ५००/- च्या पटीत स्वीकारला जाईल.

श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल:

श्रीराम फायनान्स लिमिटेड ही श्रीराम ग्रुपची मुख्य कंपनी असून कन्झ्युमर फायनान्स, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, स्टॉक ब्रोकिंग आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायात तिचा मोठा वाटा आहे. रु. ३.०२ ट्रिलियनपेक्षा जास्त व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) असलेली ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल अ‍ॅसेट फायनान्सिंग नॉन-बैंकिंग फायनान्स कंपन्यांपैकी (NBFC) एक आहे.
१९७९ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी छोटे रस्ते वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करते. तसेच जुन्या व्यावसायिक वाहनांच्या आणि दुचाकींच्या संघटित वितरणात ती आघाडीवर आहे. कंपनीच्या विविध उत्पादनांमध्ये पॅसेंजर कमर्शियल वेहिकल्स, एमएसएमई (MSMEs) कर्जे, ट्रॅक्टर्स आणि शेतीची उपकरणे, सुवर्ण कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वर्किंग कॅपिटल कर्ज इत्यादींचा समावेश आहे. गेल्या ४७ वर्षांत कंपनीने कर्ज मंजुरी, जुन्या वाहनांचे व इतर मालमत्तेचे मूल्यांकन आणि कर्ज वसुली क्षेत्रात मजबूत कौशल्य विकसित केले आहे. श्रीराम फायनान्सचे देशभरात ३,२२५ शाखांचे जाळे पसरलेले असून, ७६,२४१ कर्मचारी आणि ९७.३३ लाख ग्राहक आहेत.

RBI Rules: बँक खात्याचे KYC अपडेट नसल्यास Freez होऊ शकतं अकाऊंट? काय आहे RBI चा नियम

Web Title: Shriram finance has hiked interest rates on fixed deposits now earn up to 750 interest on investments check out the new rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Business News
  • FD
  • Finance News

संबंधित बातम्या

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
1

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’
2

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका
3

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
4

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.