Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसाल्याच्या शेतीने पालटू शकते विदर्भातील शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र -शेतीतज्ञ मुझफ्फर हुसैन

Muzaffar Hussain: विदर्भातील शेतकरी पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत, कारण ती त्यांच्या पारंपरिक पद्धतींशी, हवामानाशी आणि बाजारपेठेच्या सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत आहे. मात्र, बदलत्या काळात टिकाऊ शेती आणि आर्थिक स्थैर्यासाठ

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 17, 2025 | 11:02 AM
मसाल्याच्या शेतीने पालटू शकते विदर्भातील शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र -शेतीतज्ञ मुजफ्फर हुसैन (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

मसाल्याच्या शेतीने पालटू शकते विदर्भातील शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र -शेतीतज्ञ मुजफ्फर हुसैन (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Muzaffar Hussain Marathi News: महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे दोन वेळा सदस्य असलेले सय्यद मुझफ्फर हुसैन हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत आणि मुंबईजवळील मीरा रोड येथे त्यांचे वडील सय्यद नजर हुसैन यांच्या टाउनशिप विकसित करण्याचा व्यवसाय ते पुढे चालवत होते. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या त्यांना सतत त्रास देत राहिल्या.
विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांना राज्यातील विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः ग्रामीण भाग आणि शेतकरी यांच्या समस्यांचा अभ्यास करताना त्यांच्या हे लक्षात आले की केवळ धोरणे आणि योजनांच्या माध्यमातून शाश्वत बदल घडवता येईलच असे नाही. शेती क्षेत्राला दीर्घकालीन स्थैर्य देण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून, शेतकऱ्यांसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे.

विदर्भासारख्या भागात सातत्याने दुष्काळ, जमिनीचा ऱ्हास आणि शेतीवरील अस्थिरता ही मोठी समस्या होती. या समस्यांवर केवळ चर्चांच्या पलीकडे जाऊन कृतीशील उपाय शोधणे गरजेचे होते. याच भावनेतून, मुझफ्फर हुसैन यांनी शेतीत उतरून प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि मल्टी-क्रॉपिंगसारख्या नव्या संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणल्या. शेतकऱ्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळावे, जमिनीचे आरोग्य सुधारावे आणि टिकाऊ शेतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केला. त्यांच्या शेतीप्रयोगाचा उद्देश केवळ एक यशस्वी मॉडेल तयार करणे नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणे हा आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या नव्या दृष्टिकोनातून पाहून त्यावर ठोस उपाय शोधण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

‘या’ आयटी शेअर्समध्ये गोंधळ, सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

विदर्भातील परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मसाला शेतीकडे वळवणे हे आव्हान

विदर्भातील शेतकरी पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत, कारण ती त्यांच्या पारंपरिक पद्धतींशी, हवामानाशी आणि बाजारपेठेच्या सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत आहे. मात्र, बदलत्या काळात टिकाऊ शेती आणि आर्थिक स्थैर्यासाठी नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. मसाल्याच्या शेतीला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून, योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांशी जोडणी केल्यास ही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

‘प्रथम, जमिनीची क्षमता समजून घेत कठीण परिस्थितीत टिकणाऱ्या मसाला पिकांची निवड करण्यात आली. कृषी तज्ज्ञ डॉ. एम.एन. वेणुगोपाल (Former H.O.D.spice division ICAR), यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल संशोधन केल्यानंतर, मल्टी-क्रॉपिंग, ड्रिप इरिगेशन, जलसंधारण तंत्रज्ञान आणि जैविक खते यांचा प्रभावी वापर करून शाश्वत शेतीचे मॉडेल विकसित करण्यात आले. त्याअंतर्गत विदर्भात काळी मिरी, तीन प्रकारची हळद, तीन प्रकारची काळी आलं, काजूच्या चार जाती, चिंचेच्या जाती, फणसाच्या २२ जाती, महोगनी, सिल्व्हर ओक, कोकम, बांबू, गुजरात केसर आंबा, तामालपत्र (तेजपत्ता) तसेच मलयाबाद चौसा, आंब्याच्या १५ विविध जाती, दशेरी आंबा, संत्रा, मोसंबी, नारळ, इलायची केळी, दालचिनी, जायफळ ही पिके घेतली जात आहेत.’ असे मुझफ्फर हुसैन म्हणाले.

विदर्भाच्या हवामानास अनुकूल आणि पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक उत्पन्न देणारी ही पिके शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. शेतकऱ्यांनी या नव्या संधींचा स्वीकार करावा यासाठी प्रशिक्षण शिबिरे, प्रत्यक्ष शेतात अनुभवसत्रे आणि बाजारपेठेपर्यंत थेट जोडणी करण्यावर भर दिला जात आहे. परिवर्तन सहज घडत नाही, मात्र शेतकऱ्यांना जेव्हा शाश्वत उत्पन्नाची खात्री आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध होते, तेव्हा ते नव्या संधी स्वीकारतात. विदर्भातील शेती अधिक उत्पादनक्षम आणि लाभदायक बनवण्यासाठी मसाला शेती हा महत्त्वाचा पर्याय आहे, आणि याच्या व्यापक प्रसारासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

विदर्भात पारंपारिक पिकांची जागा सोयाबीन पिकाने घेतली

विदर्भात संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर आणि हरभरा ही पारंपरिक पिके घेतली जातात, मात्र सोयाबीनच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि जैवविविधता घटत आहे. यावर उपाय म्हणून मल्टी-क्रॉपिंग आणि मसाला शेती हा शाश्वत पर्याय ठरू शकतो. विदर्भाच्या हवामानाला अनुरूप असलेली हळद, काळी मिरी, आलं, कोकम, चिंच, काजू, तेजपत्ता, फणस आणि दालचिनी यांसारखी मसाला पिके अधिक लाभदायक ठरू शकतात. जलसंधारण, ड्रिप इरिगेशन आणि जैविक खते यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अधिक उत्पादक होईल. योग्य मार्गदर्शन, हमीभाव आणि बाजारपेठ मिळाल्यास शेतकरी नक्कीच या परिवर्तनाचा स्वीकार करतील, आणि विदर्भातील शेती अधिक शाश्वत व फायदेशीर बनेल.

मसाल्याची शेती परंपरागत शेतीला प्रभावी आणि शाश्वत पर्याय

मसाल्याची शेती परंपरागत शेतीला एक प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकते, विशेषतः मल्टीक्रॉपिंगच्या दृष्टिकोनातून. मल्टीक्रॉपिंगमुळे शेतकऱ्यांना एकाच जमिनीत विविध पिकांचे उत्पादन घेता येते, ज्यामुळे वर्षभर नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात. उदाहरणार्थ, हळद आणि आल्याच्या सोबत फळझाडे किंवा डाळींची लागवड केल्यास जमिनीतील पोषणतत्त्वांचे संतुलन टिकून राहते, सुपीकता वाढते आणि उत्पादनक्षमता सुधारते. याशिवाय, विविध पिकांच्या योग्य संयोगामुळे कीड आणि रोगांचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे उत्पादन खर्चही नियंत्रित ठेवता येतो.

विदर्भाच्या हवामानाचा विचार करता, हळद, आलं, काळी मिरी, कोकम, चिंच आणि काजू यांसारखी मसाला पिके इथे चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य सिंचन प्रणाली आणि जैविक शेतीचा अवलंब केल्यास ही शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे, पारंपरिक शेतीत परिवर्तन घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मसाला शेती हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

मसाल्याच्या शेतीने शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र पालटू शकते

विदर्भाच्या पारंपरिक शेतीला मसाला पिकांचा पूरक आधार देत शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर आणि शाश्वत शेतीकडे वळवत आहेत. हळद, मिरी, आणि कोकम यांसारख्या पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. योग्य मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि प्रक्रिया उद्योगाशी थेट जोडणी करून आम्ही शेतकऱ्यांना जागतिक बाजारात स्पर्धेसाठी सक्षम करत आहोत. विदर्भाचा शेतकरी केवळ उत्पादक न राहता एक यशस्वी उद्योजक बनावा, हा आमचा दृढ संकल्प असल्याचे मुझफ्फर हुसैन यांनी सांगितले.

विदर्भात उन्हाळ्यात तापमान जास्त असते त्याचा मसाल्याच्या शेतीवर परिणाम होऊ शकतो

विदर्भातील तीव्र उन्हाळा काही पिकांसाठी आव्हानात्मक असला, तरी योग्य तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाने त्यावर मात करता येते. शेतकऱ्यांना मल्चिंग, अत्याधुनिक सिंचन व्यवस्थापन आणि सावलीत वाढणाऱ्या पिकांची निवड करणे महत्वाचे असते. काळी मिरी, हळद आणि आलं ही पिके सावलीत चांगली वाढतात, त्यामुळे हवामानाच्या प्रभावाला तोंड देत अधिक उत्पादन शक्य आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रांचा वापर केल्यास विदर्भातील शेतकरी अधिक सक्षम आणि फायदेशीर शेती करू शकतो.

विदर्भात अकोला आणि नागपूर येथे दोन कृषी महाविद्यालये आहेत, मसाला शेतीबाबत त्यांची भूमिका

अकोला आणि नागपूर येथील कृषी विद्यापीठे मसाला शेतीच्या संशोधन आणि तांत्रिक सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या संस्थांशी समन्वय साधून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करणे, त्यांच्या संशोधनावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान आणि उन्नत पीक पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करणे, जेणेकरून विदर्भातील शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर ठरू शकेल.

मसाल्याच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे

मसाल्याच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही निश्चितच मोठी प्रक्रिया आहे. मात्र, योग्य नियोजन आणि धोरणात्मक अंमलबजावणी केल्यास ती प्रभावीपणे राबवता येऊ शकते.

प्रशिक्षण आणि सक्षमीकरण: आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि विपणन कौशल्य शिकवण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्रे आणि कार्यशाळांचे आयोजन.

संशोधन व नवोपक्रम: कृषी विद्यापीठे आणि क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत समन्वय साधून नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित पीक व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.

थेट बाजारपेठ जोडणी: शेतकऱ्यांना मोठ्या कंपन्या, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांशी जोडून त्यांना अधिक लाभदायक दर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

ब्रँडिंग आणि मूल्यवर्धन: मसाल्याच्या उत्पादनाचे ब्रँडिंग करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा प्रवेश सुनिश्चित करणे, तसेच प्रक्रिया उद्योगांशी समन्वय साधून त्याचे व्यावसायीकरण करणे.

हे सर्व उपक्रम विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ उत्पादक म्हणून मर्यादित न ठेवता त्यांना यशस्वी उद्योजक म्हणून घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मसाला शेती हा केवळ एक पर्याय नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी संधी आहे. योग्य तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती आणि बाजारपेठेतील योग्य संधींचा लाभ घेतल्यास शेतकरी स्वतःच्या उत्पादनाला अधिक मूल्यवर्धन करून मोठ्या स्तरावर यश मिळवू शकतात. याच उद्देशाने AsmitaOrganicFarm.com शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध असून, त्यांना मार्गदर्शन व सहकार्य देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

Share Market Holiday: धुळवडच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार? जाणून घ्या सर्वकाही…

Web Title: Spice farming can change the economic picture of farmers in vidarbha agricultural expert muzaffar hussain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • Business News
  • farmer

संबंधित बातम्या

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य
1

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

Quick Heal कडून टोटल सिक्युरिटी Version 26 लाँच, AI Technology मुळे सुरक्षित अजूनच दृढ होणार
2

Quick Heal कडून टोटल सिक्युरिटी Version 26 लाँच, AI Technology मुळे सुरक्षित अजूनच दृढ होणार

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न
3

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.