Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंगच्या वेळेत झाला मोठा बदल! नवीन CAS सिस्टीम लागू; जाणून घ्या डिटेल्स

Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आणि मुंबई शेअर बाजारातील BSE ट्रेडिंगच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, नवीन कॉलबॅक ऑक्शन सेशन CAS सिस्टीम अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 06:41 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी महत्त्वाची बातमी
  • वेळेत झाला मोठा बदल!
  • नवीन CAS सिस्टीम लागू
Stock Market New Timing: शेअर मार्केटशी जोडलेले आहात ( Stock Market New Timing ) तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ऑगस्टपासून, एक्सचेंज एक नवीन बदल लागू करणार आहेत. हा नवीन बदल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मार्केट रेगुलेटर ‘सिक्योरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजे SEBI ने सिक्योरिटीजसाठी ‘क्लोजिंग ऑक्शन सेशन’ (सीएएस) जाहीर केले आहे. ज्यामध्ये एफ अँड ओ ट्रेडिंगसाठी परवानगी देखील देण्यात आली आहे जेणेकरून अंतिम किमतींमध्ये फेरफार करणे अधिक कठीण होईल. सोमवारपासून, एक्सचेंज F & O स्टॉक्ससाठी व्हॉल्यूम-वेटेज्ड ॲव्हरेज प्राईस (VWAP) प्रणालीवरून CAS सिस्टीमकडे वळणार आहेत.

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

नेमकं काय बदलणार ?

शेअर्सची अंतिम किंमत निश्चित करण्यासाठी, CAS हे दुपारी ३:१५ ते ३:३० या वेळेत होणारे एक नवीन १५-मिनिटांचे सत्र असणार आहे. आतापर्यंत, एखाद्या शेअरची अंतिम किंमत प्रामुख्याने मागील ३० मिनिटांत म्हणजेच दुपारी ३:०० ते ३:३० या वेळेमध्ये झालेल्या व्यवहाराच्या सरासरी किमतीवर आधारित होती. ३ ऑगस्टपासून, अंतिम किंमत निश्चित करण्यासाठी एक्सचेंज क्लोजिंग ऑक्शन आयोजित करण्यात येणार आहे. CAS अंतर्गत, खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्स एकत्रित करून एकाच समतोल किंमतीवर जुळवल्या जातील. इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज बाजारात व्यवहार करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, पहिल्या टप्प्यात, ही उपाययोजना केवळ अशा स्टॉक्सना लागू होईल, ज्यांमध्ये F&O ट्रेडिंगला परवानगी आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांवर परिणाम होईल का?

१२९ वेल्थचे फंड मॅनेजर आणि पॉल असेटचे रिसर्च अॅनालिस्ट प्रसेनजीत पॉल म्हणाले की, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा जरी मोठ्या प्रमाणावर पडद्यामागील बदल असला तरी, यामुळे क्लोजिंग प्राईस अधिक अचूक होतील. ज्यामुळे म्युच्युअल फंडांची एनएव्ही (NAV) आणि पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन अधिक अचूक होईल. त्यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीला ही प्रणाली केवळ एफ अँड ओ (F&O) सेगमेंटमधील स्टॉक्सना लागू होईल, तर बहुतेक लिस्टेड स्टॉक्सचा व्यापार पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

SEBI हा बदल का करतेय?

या बदलाचा उद्देश दोन समस्यांचे निराकरण करणे आहे. झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी अलीकडेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, शेअरच्या किमतींमधील फेरफार रोखणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. ते म्हणाले की, निर्देशांकांचा मागोवा घेणाऱ्या पॅसिव्ह फंडांना दिवसाच्या शेवटी क्लोजिंग प्राईसशी जुळवून घेण्यासाठी मोठ्या ऑर्डर्स कार्यान्वित कराव्या लागतात आणि या ऑर्डर्समुळे किमती बदलू शकत असल्याने, ट्रॅकिंग एररचा धोका वाढतो.

दुसरे म्हणजे, त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की शेवटच्या काही मिनिटांत दिलेल्या मोठ्या ऑर्डर्समुळे स्टॉक्सच्या आणि ते ज्या निर्देशांकांचा भाग आहेत त्यांच्या क्लोजिंग प्राईसवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ते म्हणाले, “याचा वापर निर्देशांकाला एका विशिष्ट क्लोजिंग पातळीवर नेण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. CAS सर्व ऑर्डर्स एकत्र आणून त्यांना एकाच किमतीवर जुळवत असल्यामुळे, क्लोजिंग प्राईसवर प्रभाव टाकणे कठीण होते.”

Govt Scheme: एकही रुपया जमा न करता सरकार देत आहे 25000 रुपये? कोणाला मिळणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Web Title: Stock market new timing trading cas system implemented marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • NSE
  • sensex
  • Sensex Update
  • share market

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.