Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Jaggery Price Hike : या सगळ्याला ‘इथेनॉल’ जबाबदार? सर्वसामान्यांचा खिशाला फटका, सणांपूर्वीच साखर अन् गुळाचे दर वाढले

Sugar Jaggery Price Hike : आगामी सण-उत्सवांच्या तोंडावरच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची मोठी झळ बसणार आहे. अवघ्या १५ दिवसांत साखरेच्या दरात तब्बल १७ रुपयांची तर गुळाच्या दरात ४० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणामुळे आणि साखरेच्या उपलब्धतेवरील दबावामुळे ही दरवाढ झाली आहे असं बोललं जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 18, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • या सगळ्याला ‘इथेनॉल’ जबाबदार?
  • सर्वसामान्यांचा खिशाला फटका
  • सणांपूर्वीच साखर अन् गुळाचे दर वाढले
Sugar Jaggery Price Hike : जागतिक परिस्थितीतील उलथापालथ यामुळे महागाईने डोकंवर तर केलं आहे. पण आता या सगळ्यात मध्येच साखरेचे दर अचानक वाढले आहे. कालपर्यंत लोक सहजपणे एक-दोन किलो विकत घेऊन घरी आणू शकत असलेल्या साखरेच्या किमतीने अचानक स्वयंपाकघरातील सामानाची व्यवस्था बिघडवली आहे. गेल्या १५ दिवसांत साखर प्रति किलो सुमारे १७ रुपयांनी, तर गूळ जवळपास ४० रुपयांनी महाग झाला आहे. ( Sugar Jaggery Price Hike ) 

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

सणासुदीच्या तोंडावर ही झालेली वाढ सामान्यांच्या खिशाला धक्का देणारी आहे. त्यामुळे परिणामी, घरगुती चहापासून ते चॉकलेट, दूध, खीर, ज्यूस आणि मिठाईपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये महागाईचे परिणाम दिसून येत आहेत. या सगळ्याला कारण केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणामुळे आणि साखरेच्या उपलब्धतेवरील दबावामुळे ही दरवाढ झाली आहे असं बोललं जात आहे. नेमकं काय कारण आहे? सणासुधीच्या आधी सामान्यांच्या खिशाला कसा झटका लागत आहे आणि पुढे काय होणार?

वाढत्या किमतींमुळे बाजारात भितीचं वातावरण

साखर आणि गुळाच्या वाढत्या किमतींमुळे बाजारात भितीचं वातावरण पसरवत आहे. सामान्य नागरिक आणि व्यावसायिक या दोघांमध्येही चिंता वाढली आहे. यामुळे काळाबाजार वाढण्याची भीती आहे. काही व्यावसायिकांनी सरकारला साखर आणि गुळाच्या किमती तात्काळ नियंत्रित करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा दिवाळीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्या आणि नवीन दरांमध्ये लक्षणीय तफावत

साखरेसोबतच गुळाच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे घरगुती बजेटमध्येही अडथळा निर्माण झाला आहे. किरकोळ विक्रेता प्रवीण गोयल यांच्या मते, १५ दिवसांपूर्वी गुळाचा भाव ६० रुपये प्रति किलो होता, पण आज तो १०० रुपये प्रति किलोपर्यंत उपलब्ध आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी साखरेचा भाव ४८ रुपये प्रति किलो होता.

पण आता त्याचा भाव ६२ ते ६५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. इतकेच नाही तर, महिन्याभरापूर्वी ९०० रुपये प्रति किलो दराने मिळणारे बदाम आता १,१०० रुपये प्रति किलोपर्यंत मिळत आहेत. यामुळे मिठाईची दुकाने, चहाची दुकाने, कन्फेक्शनरी, बेकरी आणि अन्न उत्पादक यांसारख्या लहान व्यवसायांचा खर्च वाढेल.

साखरेचे भाव का वाढत आहेत?

एका घाऊक साखर व्यापाऱ्याने सांगितले की, यावर्षी देशात ३,२०,००० टन साखरेचे उत्पादन अपेक्षित होते, परंतु केवळ २,८०,००० टन उत्पादन झाले आहे. साखर इतर देशांमध्ये निर्यातही केली जात होती, परंतु वाढत्या महागाईमुळे साखरेची निर्यात सध्या थांबवण्यात आली आहे.

असे असूनही, साखरेच्या दरात घट झालेली नाही. व्यापाऱ्यांचा दावा आहे की, गेल्या दोन महिन्यांत घाऊक बाजारात साखरेचा भाव सुमारे १५ रुपयांनी वाढला आहे. सरकारने १ ऑगस्टपासून साठ्यावर मर्यादाही घातली आहे. घाऊक व्यापारी आता ३० दिवसांत ४,००० क्विंटल साखर विकू शकतील. महागाईमध्ये इथेनॉलचाही वाटा असल्याचे मानले जाते.

Gen Z Financial Crisis : दिखाव्यासाठी कर्ज अन् EMI चा डोंगर! ‘उधाराच्या श्रीमंतीत’ जगतेय जेन झी; ‘या’ चुका पडतील महागात

Web Title: Sugar jaggery price hike festive season inflation skyrocket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Sugar

संबंधित बातम्या

Eknath Shinde Marathi Speech:मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान
1

Eknath Shinde Marathi Speech:मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान

Palghar Eco Sensitive Zone : वाडा, मोखाड्यातील जमिनींना नव्या पाबंदी? केंद्राचा निर्णय; पालघरमध्ये 126 गावे इको-सेन्सिटिव्ह कक्षेत
2

Palghar Eco Sensitive Zone : वाडा, मोखाड्यातील जमिनींना नव्या पाबंदी? केंद्राचा निर्णय; पालघरमध्ये 126 गावे इको-सेन्सिटिव्ह कक्षेत

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
3

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
4

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.