Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत आर्थिक विकासाला मिळणार गती, ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा भव्य शुभारंभ

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता गाव तिथे उद्योजक. तरूण उद्योजकांना नवी दिशा दाखविण्यासाठी मोठं पाऊल. गाव तिथे उद्योजक नवे अभियान सुरू. कुडाळ इथे पार पडला शुभारंभ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 20, 2026 | 10:53 AM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव तिथे उद्योजक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव तिथे उद्योजक

Follow Us
Follow Us:
  • सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मोठं पाऊल
  • MACCIA च्या वतीने विस्तार
  • गाव तिथे उद्योजक अभियानाचा शुभारंभ 
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेची नवी दिशा दाखवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या वतीने आपल्या संघटनात्मक विस्ताराचा भाग म्हणून कुडाळ येथे नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याच सोहळ्यात ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ​हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

Sindhudurga News: परप्रांतीयांच्या शेतजमीन खरेदीची SIT चौकशी; बावनकुळे यांचे स्पष्ट निर्देश

रविंद्र माणगावे यांची संकल्पना 

​महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या संकल्पनेबद्दल बोलताना ते म्हणाले ‘ग्रामीण महाराष्ट्रात अथांग क्षमता आणि कौशल्य दडलेले आहे. ‘गाव तिथे उद्योजक’ हे केवळ एक अभियान नसून प्रत्येक गावात नवीन उद्योजक घडवून ग्रामीण अर्थव्यवस्था थेट मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. सिंधुदुर्गातील नवीन कार्यालयामुळे स्थानिक व्यावसायिकांना मार्गदर्शन मिळणे अधिक सोपे होईल.’  ​कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांच्या विशेष पुढाकारातून ही विस्तार मोहीम आणि अभियान सिंधुदुर्गात पोहोचले आहे.

शासनाचे पाठबाळ मिळण्याची नितेश राणेंची ग्वाही 

​या प्रसंगी राज्य शासनाच्या पाठबळाची ग्वाही देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, ​’ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे वळवणे आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभे करणे ही काळाची गरज आहे. एमएसीसीआयए चे हे पाऊल कोकणाच्या आर्थिक समीकरणांना नवी ताकद देईल. या अभियानाला आणि मछायाच्या उपक्रमांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.’ 

​या सोहळ्याला महाराष्ट्र चेंबरचे ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, सुनिता फाल्गुने यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर्स आणि स्थानिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या विस्तारामुळे आणि अभियानामुळे सिंधुदुर्गातील ग्रामीण युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळणे सुलभ होणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी गती मिळणार आहे. या पुढाकाराकडे आता अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तरूणांना आता चांगली संधी मिळेल अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

NITESH RANE: संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल; अमित शाहांवर टीका करण्याची ‘लायकी नाही’

Web Title: Sustainable economic development of sindhudurg district set to gain momentum gaon tithe udyojak campaign started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Nitesh Rane
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
1

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
2

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Sindhudurg Ganpati: २१ दिवस विराजमान होतो ‘अभिनवनगरचा राजा’; नवसाला पावणाऱ्या गणरायाची शेकडो वर्षांची परंपरा
3

Sindhudurg Ganpati: २१ दिवस विराजमान होतो ‘अभिनवनगरचा राजा’; नवसाला पावणाऱ्या गणरायाची शेकडो वर्षांची परंपरा

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश
4

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.