Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors चा मोठा धमाका! ‘कौशल्य’ उपक्रमातून 23000 तरुणांना ट्रेनिंग; 5000 पेक्षा जास्त जणांना मिळाली रोजगाराची संधी

टाटा मोटर्सच्या कौशल्य उपक्रम महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी कॉर्पोरेट सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे 23000 हून अधिक तरुणांचं सक्षमीकरण 5000 पेक्षा जास्त तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 13, 2026 | 06:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Tata Motors चा मोठा धमाका!
  • ‘कौशल्य’ उपक्रमातून 23000 तरुणांना ट्रेनिंग
  • 5000 पेक्षा जास्त जणांना मिळाली रोजगाराची संधी
वर्ल्ड युथ स्किल्‍स डे च्‍या पूर्वसंध्येला टाटा मोटर्स आपल्या प्रमुख ‘कौशल्य’ उपक्रमाद्वारे भारतातील तरुणांच्या आकांक्षा आणि यशाचा गौरव करत आहे. हा देशातील सर्वात मोठा उद्योग-नेतृत्वित कौशल्य उपक्रम आहे. शिक्षण आणि रोजगारक्षमता यांमधील तफावत दूर करण्‍यासाठी डिझाइन केलेल्या या उपक्रमात २३,००० हून अधिक तरुणांनी नोंदणी केली आहे, ५,००० पेक्षा जास्त पदवीधरांना १०० टक्‍के प्लेसमेंट दरासह रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, ज्यामध्ये ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्सचा समावेश आहे.

SEBI ने कर्मचाऱ्यांसाठी कडक केले नियम! Share Market मध्ये गुंतवणुकीवर आणली गदा, नोकरी बदलण्यावरही वाढली देखरेख

तरुणांसाठी अर्थपूर्ण करिअरचे मार्ग

भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करत असताना कौशल्य उपक्रम प्रगत उत्पादन, ऑटोमेशन आणि उदयोन्मुख मोबिलिटी तंत्रज्ञानामध्ये भविष्य-सज्ज कौशल्ये असलेल्या तरुणांसाठी अर्थपूर्ण करिअरचे मार्ग तयार करत आहे. यामुळे कुशल टॅलेंटसाठी उद्योगाची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होत आहे. रोजगारक्षमतेच्या पलीकडे जाऊन कौशल्य उपक्रम उत्पादन क्षेत्रातील करिअरसाठी वंचित किंवा प्रतिनिधित्व कमी असलेल्या घटकांनाही संधी मिळवून देत आहे. यामध्ये महिलांचा सहभाग २१ टक्‍के आहे, तर २५ टक्‍के सकारात्मक कृती प्रवर्गातील आहेत. यासह भविष्यासाठी अधिक वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि न्याय्य कर्मचारीवर्ग उभारण्याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

विकासात सहभागी होण्यासाठी तरुणांना सक्षम बनवण्यात

टाटा मोटर्सचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर सीताराम कांडी म्हणाले, “भारतामधील उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि गतिशीलतेच्या आकांक्षा येथील कर्मचारीवर्गाच्‍या गुणवत्तेवर आधारित असतील. कौशल्य उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही टेक्निकल शिक्षण, औद्योगिक अनुभव आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांची सांगड घालणाऱ्या संधी निर्माण करून कुशल व्यावसायिकांच्या भावी पिढीमध्ये गुंतवणूक करत आहोत. हा उपक्रम तरुणांना अर्थपूर्ण करिअर घडवण्यास मदत करत आहे, आणि वेगाने प्रगत व तंत्रज्ञानावर आधारित होत चाललेल्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कुशल टॅलेंटची साखळी दृढ करत आहे. आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी मिळवलेल्‍या उत्कृष्ट प्लेसमेंट निकालामधून निदर्शनास येते की, प्रासंगिक, रोजगारक्षम आणि भविष्य-सज्ज कौशल्ये निर्माण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहयोग प्रभावी ठरते. आम्ही या उपक्रमाचा विस्तार वाढवण्यासाठी आणि भारताच्या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी अधिकाधिक तरुणांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

‘कमावा आणि शिका’ मॉडेल

२०२१ मध्ये सुरू झालेला आणि पुणे, जमशेदपूर, लखनौ, पंतनगर, साणंद आणि धारवाड येथील उत्पादन केंद्रांमध्ये कार्यरत असलेला हा उपक्रम ‘कमावा आणि शिका’ (अर्न-अँड-लर्न) मॉडेल अंतर्गत पूर्णपणे प्रायोजित डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स कोर्स प्रदान करतो. उद्योग तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेला आणि गतिशीलतेच्या भविष्याला आकार देणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेला अभ्यासक्रम क्लासरूममधील शिक्षणासह टाटा मोटर्सच्या उत्पादन केंद्रांमधील प्रत्यक्ष शॉप-फ्लोअरचा उत्तम अनुभव एकत्र आणतो. प्रशिक्षणार्थी यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन, आयओटी आणि इंडस्ट्री ४.० मधील कौशल्ये आत्मसात करतात.

जागतिक स्तरावर करिअरच्या संधी

हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना टाटा मोटर्सच्या विस्तारित परिसंस्‍थेमध्ये पद्धतशीर प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामध्ये डीलरशिप्स, पुरवठादार, विक्रेते, टाटा ग्रुप कंपन्या, इतर ऑटोमोबाईल उत्पादक आणि आंतरराष्ट्रीय नियोक्ते यांचा समावेश आहे. कौशल्यचे माजी विद्यार्थी आज विविध उद्योगांमध्ये आपले योगदान देत आहे, जिथे ते टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लि., टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लि., झायडस, जेएसडब्ल्यू ग्रीनटेक, सुब्रोज, स्पिनी, विप्रो यांसारख्या नामांकित कंपन्‍यांमध्ये कार्यरत आहेत. या उपक्रमाने जागतिक स्तरावर करिअरच्या संधी देखील खुल्या केल्या आहेत, ज्या अंतर्गत ५० पदवीधरांना स्लोव्हाकियातील नित्रा येथील जग्वार लँड रोव्हरच्या उत्पादन केंद्रात रोजगार मिळाला आहे.

स्वप्न पाहण्याची हिंमत करणाऱ्या प्रत्येकासाठी

सध्या स्लोव्हाकियातील जग्वार लँड रोव्हरमध्ये कार्यरत असलेल्या आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्सच्या माजी प्रशिक्षणार्थी अनिता केंदे बेठेकर आपला अनुभव सांगत म्हणाल्‍या, “महाराष्ट्रातील एका दुर्गम आदिवासी गावातून आल्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात जागतिक स्तरावर करिअर करणे एकेकाळी माझ्या कल्पनेच्या पलीकडे होते. टाटा मोटर्सच्या कौशल्य उपक्रमाने मला कौशल्ये, अनुभव आणि आत्मविश्वास दिला, ज्‍यामुळे मी संधींचा पाठपुरावा करू शकले, ज्यांचा मी कधी विचारही केला नव्हता. आज मला अभिमान वाटतो की, मी माझ्या गावातील आणि आसपासच्या परिसरातील पहिली मुलगी आहे, जिच्याकडे स्वतःचा पासपोर्ट आहे आणि स्लोव्हाकियामध्ये जग्वार लँड रोव्हरसोबत करिअर घडवत आहे. हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी आणि आपल्या परिस्थितीपलीकडे जाऊन स्वप्न पाहण्याची हिंमत करणाऱ्या प्रत्येक तरुण मुलीसाठी अभिमानाचा स्रोत आहे.

संधी देऊन चित्र बदलले

सध्या टाटा मोटर्स कस्टमर सपोर्टमध्ये कार्यरत असलेले आणि डिप्लोमा इन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचे माजी प्रशिक्षणार्थी सोहम रवींद्र मानमोडे आपला अनुभव सांगत म्हणाले, “एका लहान गावातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबातून आल्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात करिअर करणे हे एकेकाळी माझ्यासाठी दूरचे स्वप्न वाटत होते. टाटा मोटर्सच्या कौशल्य उपक्रमाने मला एकाच वेळी शिकण्याची, कमावण्याची आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव घेण्याची संधी देऊन हे चित्र बदलले. या उपक्रमाद्वारे मी मिळवलेली कौशल्ये, आत्मविश्वास आणि अनुभवामुळे मला टाटा मोटर्समध्ये उत्तम करिअर घडवण्यास मदत झाली. आज मला माझ्या कुटुंबाला हातभार लावताना आणि भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या प्रगतीमध्ये योगदान देताना अत्यंत अभिमान वाटतो.

दरवर्षी ५,००० हून अधिक प्रशिक्षणार्थी उद्योगासाठी सज्ज होण्याची अपेक्षा असल्याने कौशल्य उपक्रम भारतातील ऑटोमोटिव्ह आणि उत्पादन क्षेत्रासाठी शाश्वत टॅलेंटची साखळी तयार करण्यास मदत करत आहे. हा उद्योग इलेक्ट्रिफाइड, कनेक्टेड आणि सॉफ्टवेअर-आधारित गतिशीलतेकडे वाटचाल करत आहे, तसे टाटा मोटर्स तरुणांना भविष्य-सज्ज कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी, रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आणि भारताच्या औद्योगिक विकासाच्या पुढील टप्प्यात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Govt Survey : राशनपासून कपड्यांपर्यंत… तुम्ही कुठे, किती पैसे खर्च करता? खर्चाचा हिशोब ठेवणार सरकार? केली मोठी घोषणा

Web Title: Tata motors kaushalye initiative trains 23000 youth provides 5000 jobs see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Tata
  • Tata Moters
  • tata motors

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

काय सांगताय? ATM मोठ्या संख्येने बंद होणार, मग कॅश कशी काढायची? बँकांचा ‘हा’ नवीन मास्टरप्लॅन, जाणून घ्या
2

काय सांगताय? ATM मोठ्या संख्येने बंद होणार, मग कॅश कशी काढायची? बँकांचा ‘हा’ नवीन मास्टरप्लॅन, जाणून घ्या

SEBI ने कर्मचाऱ्यांसाठी कडक केले नियम! Share Market मध्ये गुंतवणुकीवर आणली गदा, नोकरी बदलण्यावरही वाढली देखरेख
3

SEBI ने कर्मचाऱ्यांसाठी कडक केले नियम! Share Market मध्ये गुंतवणुकीवर आणली गदा, नोकरी बदलण्यावरही वाढली देखरेख

LPG Cylinder Update: गॅस कंपन्यांचा मोठा प्लॅन? 10 किलोच्या कंपोजिट सिलेंडरवर नवी योजना, लोखंडाऐवजी आता…
4

LPG Cylinder Update: गॅस कंपन्यांचा मोठा प्लॅन? 10 किलोच्या कंपोजिट सिलेंडरवर नवी योजना, लोखंडाऐवजी आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.