Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transrail Q1 Results : ट्रान्सरेल लाइटिंग कंपनीचा आर्थिक धमाका! पहिल्या तिमाहीत 1736 कोटींचा महसूल; नफ्यात 3 टक्क्यांची वाढ

Transrail Q1 Results : पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील अग्रगण्य ईपीसी कंपनी 'ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड'ने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा महसूल ५ टक्क्यांनी वाढून १,७३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 06:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ट्रान्सरेल लाइटिंग कंपनीचा आर्थिक धमाका!
  • पहिल्या तिमाहीत 1736 कोटींचा महसूल
  • नफ्यात 3 टक्क्यांची वाढ
Transrail Q1 Results : ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ( Transrail Q1 Results ) या पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील अग्रगण्य ईपीसी कंपनीने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने १,७३६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीतील १,६६० कोटी रुपयांच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढला आहे; मात्र मागील तिमाहीच्या १,८६३ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

HomeLane Offers : स्वप्नातील घर सजवा आता कमी खर्चात! होमलेनचा मुंबईत ‘फ्रीडम फेस्टिव्हल’; इंटिरियर्सवर 25% सूट, मोफत किचन अन् …

कंपनीचा एबिटा २०३ कोटी रुपये नोंदवला गेला असून, तो वार्षिक आधारावर १ टक्क्याने वाढला आहे, तर तिमाही-ते-तिमाही आधारावर २ टक्क्यांनी घटला आहे. या तिमाहीत एबिटा मार्जिन ११.७ टक्के राहिली, जी मागील वर्षाच्या याच तिमाहीत १२.० टक्के आणि मागील तिमाहीत ११.१ टक्के होती.

कंपनीला १०८ कोटी रुपयांचा करोत्तर नफा

कंपनीचा करपूर्व नफा १४४ कोटी रुपये राहिला, ज्यामध्ये वार्षिक आधारावर २ टक्क्यांची घट झाली आहे, तर मागील तिमाहीच्या तुलनेत ०.३ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीचा कर खर्च ३६ कोटी रुपये राहिला. सर्व कर व खर्च वजा केल्यानंतर कंपनीने १०८ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदवला आहे. हा नफा मागील वर्षाच्या याच तिमाहीतील १०५ कोटी रुपयांच्या तुलनेत ३ टक्क्यांनी, तर मागील तिमाहीतील ९७ कोटी रुपयांच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीत कंपनीचा करोत्तर नफा मार्जिन ६.२ टक्के राहिला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत ६.३ टक्के आणि मागील तिमाहीत ५.२ टक्के होता.

उत्पादन क्षमता व अंमलबजावणी कौशल्ये प्रबळ

चालू असलेले भू-राजकीय आणि पुरवठा साखळीतील अडथळे असूनही, कंपनीने कार्यसंचालनातील उत्कृष्टता आणि जवळून केलेल्या देखरेखीच्या जोरावर सुधारित मार्जिनसह स्थिर अंमलबजावणी सादर केली आहे. उत्पादन क्षमता व अंमलबजावणी कौशल्ये प्रबळ करण्यासाठी कंपनीने बुटीबोरी टॉवर उत्पादन सुविधा सुरू केली असून, गॅक्टेल टर्नकी प्रोजेक्ट्सच्या अधिग्रहणाद्वारे कूलिंग टॉवर ईपीसी क्षमतेत वाढ करत पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. यासोबतच, मोनोपोल पुरवठा प्रोजेक्टसह ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश करत कंपनीने आपली जागतिक उपस्थिती ६ खंडांपर्यंत वाढवली आहे.

दीर्घकालीन महसूल वाढीची स्पष्टता

या तिमाहीत १,०३४ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स आणि अतिरिक्त जवळपास ४०० कोटी रुपयांच्या L1 ऑर्डर्स मिळाल्यामुळे ३० जून २०२६ पर्यंत एकूण अन-एक्झिक्युटेड ऑर्डर बुक १६,०३५ कोटी रुपये झाले आहे, ज्यामधून दीर्घकालीन महसूल वाढीची स्पष्टता दिसून येते. उत्कृष्ट आर्थिक प्रोफाइलमुळे इंडिया रेटिंग्सद्वारे कंपनीला ‘आयएनडी एए -/स्टेबल’ श्रेणीत अपग्रेड करण्यात आले आहे. याशिवाय, वाढीचा दर, प्रशिक्षण व विकास, उद्योगातील प्रतिष्ठा आणि कामाच्या ठिकाणची संस्कृती या मानकांनुसार कंपनीला प्रतिष्ठित ईटी इज‘बेस्ट ऑर्गनायझेशन्स टू वर्क २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इतर प्लांट्स विस्ताराने टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट

या आर्थिक निकालांबाबत मत व्यक्त करत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणदीप नारंग म्हणाले, “आम्ही गतिमान भू-राजकीय आणि आर्थिक वातावरणातही उत्तम आर्थिक कामगिरी कायम ठेवत आर्थिक वर्ष २०२७ ची सुरुवात केली आहे. नागपूर येथील आमच्या बुटीबोरी सुविधेची सुरुवात आणि आमच्या इतर प्लांट्सच्या विस्ताराने आमची टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे, जी आम्ही पुढे आणखी वाढवत आहोत. उत्पादनाचा विस्तार, अंमलबजावणी क्षमता आणि जागतिक बाजारपेठेचा विकास यासाठी आज आम्ही करत असलेली प्रत्येक गुंतवणूक आमचे स्थान दृढ करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणातील गुंतागुंतीचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्याची आमची क्षमता वाढवण्यासाठी केंद्रित आहे”.

सातत्यपूर्ण मागणीच्या जोरावर आम्हाला विश्वास

पुढे ते म्हणाले, “वाढीचा दर, प्रशिक्षण व विकास, उद्योगातील प्रतिष्ठा, कामाच्या ठिकाणी संस्कृती आणि व्यावसायिक मूल्ये यांसारख्या मानकांचा विचार करून या तिमाहीत आम्हाला ईटी एजकडून ‘बेस्ट ऑर्गनायझेशन्स टू वर्क २०२६’ पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले आहे. उत्तम ऑर्डरबुक, वाढलेली क्षमता, दृढ आर्थिक स्थिती आणि अंतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सातत्यपूर्ण मागणीच्या जोरावर आम्हाला विश्वास आहे की, आर्थिक वर्ष २०२७ आमच्या फायदेशीर वाढीचा मार्ग अधिक दृढ करेल आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करेल.”

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Web Title: Transrail q1 results revenue 1736 crore order book

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
3

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
4

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.