(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये FSSAI ने म्हटले आहे, “खाद्यपदार्थाच्या पॅकेजवरील तारीख हा केवळ एक आकडा नाही; तर काय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे हे निवडण्यास ती तुम्हाला मदत करते. वेगवेगळ्या तारखांच्या लेबलचा अर्थ समजून घेतल्यास अन्नाची नासाडी कमी होण्यास आणि तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यास मदत होऊ शकते. काहीही खाण्यापूर्वी नेहमी लेबल वाचा.” अशा शब्दांत पोस्ट शेअर करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#HarLabelKuchKehtaHai या मोहिमेचा एक भाग म्हणून, FSSAI ने स्पष्ट केलं आहे की ‘वापरण्याची अंतिम तारीख’ म्हणजे Use By किंवा ‘समाप्तीची तारीख’ म्हणजेच Expiry Date नेहमी तपासणे महत्त्वाचे आहे, कारण ही एक सुरक्षिततेची बाब आहे. “या तारखेनंतर अन्नपदार्थ खाऊ नका.” FSSAI च्या मते, बहुतेक लोकांना पॅकेजवरील तारखांचा योग्य अर्थ समजत नाही, ज्यामुळे अनेकदा अन्न खराब न होताही कचराकुंडीत फेकले जाते. तर या तारखांचा नेमका अर्थ काय आहे. समजून घ्या.
A date on a food package is more than just a number, it helps you make safer and smarter food choices. Understanding what different date labels mean can reduce food waste while protecting your health. Always read the label before you eat. #HarLabelKuchKehtaHai #ReadTheLabel pic.twitter.com/oSIhFS1JRx — FSSAI (@fssaiindia) August 9, 2026
Best before – ही तारीख उत्पादनाची गुणवत्ता दर्शवते. याचा अर्थ असा की, या तारखेपर्यंत अन्नपदार्थाची चव, सुगंध आणि पोत टिकून राहील. या तारखेनंतर, अन्नपदार्थ खराब होणार नाही; उलट, त्याची गुणवत्ता थोडी कमी होईल. तरीही, तो वापरला जाऊ शकतो.
Expiry Date – ही तारीख अन्न सुरक्षेसाठी अंतिम मर्यादा आहे. या तारखेनंतर अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. एक्स्पायरी डेटनंतर उत्पादन टाकून देणे शहाणपणाचं ठरेल.
FSSAI सल्ला देते की, जर एखाद्या उत्पादनाची ‘उत्तम वापराची’ तारीख नुकतीच उलटून गेली असेल, तर ते फेकून देण्याऐवजी, प्रथम त्याचा रंग, पोत आणि वास तपासा. सर्व काही ठीक असल्यास, ते वापरले जाऊ शकते. अन्न खरेदी केल्यानंतर, मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते साठवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण अयोग्य साठवणुकीमुळे अनेकदा ते वेळेपूर्वीच खराब होऊ शकते. त्यामुळे लक्ष्य द्या आणि त्यानुसारच गोष्टींचा वापर करा किंवा टाळा.






