Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Tariff Warning: ट्रम्प सरकारची मोठी कारवाई; भारतावर ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकण्याच्या तयारीसह १६ देशांविरुद्ध चौकशी सुरू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या १६ प्रमुख व्यापारी भागीदारांच्या व्यापार धोरणे आणि पद्धतींची चौकशी सुरू केली.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 12, 2026 | 10:12 AM
Trump Tariff Warning: ट्रम्प सरकारची मोठी कारवाई; भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' टाकण्याच्या तयारीसह १६ देशांविरुद्ध चौकशी सुरू (फोटो-सोशल मीडिया)

Trump Tariff Warning: ट्रम्प सरकारची मोठी कारवाई; भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' टाकण्याच्या तयारीसह १६ देशांविरुद्ध चौकशी सुरू (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेमुळे जागतिक व्यापारात तणाव वाढणार?
  • भारतासह अनेक देशांवर नव्या शुल्काची शक्यता
  • भारत, चीन, ईयूंसह १६ देशांची होणार कसून चौकशी
 

Trump Tariff Warning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या १६ प्रमुख व्यापारी भागीदारांच्या व्यापार धोरणे आणि पद्धतींची चौकशी सुरू केली. त्यांच्या धोरणात न बसलेल्या व्यापार देशांना ते अयोग्य मानून रद्द करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांविरुद्ध अतिरिक्त शुल्क किंवा इतर आर्थिक दंड आकारण्याची शक्यता वाढू शकते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी लादलेले काही शुल्क रद्द केल्यानंतर ट्रम्प सरकार नवी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे.

औद्योगिक उत्पादन क्षमतेवर सुरू केलेल्या या चौकशीत भारत, युरोपियन युनियन, चीन, जपान आणि इतर अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. या हालचालीमुळे अमेरिका आणि त्याच्या प्रमुख व्यापारी भागीदारांमधील व्यापार तणाव वाढू शकतो. मिळलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर म्हणाले की ट्रम्प सरकार दोन स्वतंत्र चौकशी सुरू करत आहे. पहिली चौकशी अत्यधिक उत्पादन क्षमतेवर केंद्रित आहे, तर दुसरी चौकशी जबरदस्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंच्या आयातीशी संबंधित आहे.

Today’s Share Market: शेअर बाजार लाल रंगात उघडणार? मध्य पूर्व युद्धाचा होतोय परिणाम; जाणून घ्या सविस्तर 

अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले, की चीन, युरोपियन युनियन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि मेक्सिकोविरुद्ध नवीन शुल्क लादले जाऊ शकते. या यादीत तैवान, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बांगलादेश, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे यांचाही समावेश आहे. तथापि, अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या कॅनडाला या चौकशीतून वगळण्यात आले आहे.

ग्रीर यांनी सांगितले की अमेरिकेने त्यांच्या नोकऱ्यांचे रक्षण केले पाहिजे आणि त्यांच्या व्यापारी भागीदारांसोबत निष्पक्ष व्यापार सुनिश्चित केला पाहिजे. जर या समस्येचे निराकरण करण्यासाठी शुल्क आवश्यक असेल तर अमेरिका निश्चितच अशी कारवाई करेल. तथापि, संभाव्य शुल्क देशानुसार बदलतील की सर्वांना समान लागू होतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही. चीनची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता त्याच्या देशांतर्गत मागणीपेक्षा खूपच जास्त आहे. असे असूनही, चीनची आघाडीची ईव्ही उत्पादक कंपनी बीवायडी उझबेकिस्तान, थायलंड, ब्राझील, हंगेरी आणि तुर्कीमध्ये कारखाने उभारत आहे आणि युरोपमध्ये विस्ताराची योजना देखील आखत आहे.

Share Market Closed: मध्यपूर्वेतील तणावाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स १,३४२ अंकांनी कोसळला

शिवाय, जर्मनी आणि आयर्लंडमधील मोठ्या व्यापारांना ईयूच्या अतिरिक्त औद्योगिक क्षमतेची उदाहरणे म्हंटले जाते. अमेरिकेसोबत व्यापार तूट असूनही सिंगापूरची मोठी उत्पादन क्षमता आणि नॉर्वेची इंधन आणि सीफूडची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील उदाहरणे म्हणून पहिली जातात. दुसरी चौकशी जबरदस्ती कामगारांपासून बनवलेल्या वस्तूंच्या आयातीशी संबंधित आहे. ग्रीर यांच्या मते, या चौकशीचा परिणाम सुमारे ६० व्यापारी भागीदार देशांवर होऊ शकतो, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळींवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

Web Title: Trump governments big action investigations against 16 countries including preparations to drop tariff bomb on india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-Israel War
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग
1

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला
2

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला

पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?
3

पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?

Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?
4

Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.