
Trump's controversial statement before Putin's India visit! Warned of 500% tariff on Russian oil purchase
Trump vs Russia Oil: अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिका सारख्या बदलत असतात. पुढील महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, याधीच ट्रम्प यांचा जळफळाट होताना दिसत असून त्यांनी रशियन तेल खरेदी केली तर 500% टॅरिफचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत व्यापार कराराबद्दल बोलत होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका कधी बदलेल सांगता येत नाही. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावरून अलीकडेच भारतीय आयातींवर 50 टक्के अतिरिक्त कर लादून युक्रेन युद्धात कडक भूमिका घेतली आहे.
भारत रशियन तेल खरेदी करत असल्याने अतिरिक्त 25% कर लादण्यात आला असताना आता ट्रम्प सरकार आणखी अतिरिक्त कर वाढवण्याची शक्यता आहे. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 500 टक्के कर लादण्याबाबत ट्रम्प यांनी विधान केले आहे.
हेही वाचा : ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब विधान केले आहे. 5 डिसेंबरला रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान मोदींसोबत भेटीदरम्यान तेलापासून व्यापारापर्यंत सगळ्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला आहे. कारण, भारत दुसरा सर्वात मोठा रशियाचा तेल खरेदीदार असल्याने ट्रम्प यांच्या या इशाऱ्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. रशियन तेल खरेदी करण्याविरुद्ध ट्रम्प यांनी उघडपणे धमकी दिली असल्याचे दिसून येत आहे. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर त्यांनी 500% पर्यंतचे अतिरिक्त कर लादण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा भारतासह जगभरातील अनेक देशांना धक्का बसला आहे.
रशियाच्या अर्थव्यवस्थेला हानी केल्याने युक्रेनसोबतचे युद्ध थांबावे यासाठी ट्रम्प यांनी शुल्कांना शस्त्रास्त्र बनवत रशियाच्या अर्थ व्यवस्थेला कमजोर करायचा प्रयत्न केला. जे रशियाशी व्यापार करतील त्या देशांवर जड निर्बंध किंवा कर लादले जातील. त्यामुळे, भारतीय रिफायनरीज अमेरिकेच्या दबावामुळे रशियन तेल खरेदी करणे थांबवले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.