UIDAI Aadhaar 5 New Changes: फोटो- सोशलमीडिया)
ही सगळ्यात मोठी सुविधा आहे. बऱ्याच लोकांचे बोटाचे ठसे मशीनवर येत नाहीत. शेतात काम करणारे, मजुरी करणारे लोक, म्हातारी माणसं यांच्या बोटाचे ठसे घासले असतात. त्यामुळे e-POS मशीनवर ठसा जुळत नाही आणि दुकानदार रेशन देत नाही.आता UIDAI ने फेस ऑथेंटिकेशन सुरू केलं आहे. म्हणजे फक्त चेहरा स्कॅन करून रेशन मिळणार. तुमची परवानगी घेऊन दुकानदार तुमचा फोटो काढेल आणि रेशन देईल. यामुळे हजारो लोकांचा त्रास वाचणार आहे. ही सुविधा आता हळूहळू सगळ्या रेशन दुकानात सुरू होत आहे. UIDAI Aadhaar 5 New Changes:
आधार सेंटरवर गेलं की मोठी रांग असते. तासंतास उभं राहावं लागतं. महिलांना, म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास होतो.आता UIDAI ने टोकन सिस्टीम आणली आहे. तुम्ही सेंटरवर गेलात की तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल. तुम्हाला रांगेत उभं राहायची गरज नाही. खुर्चीवर बसून रहा. तुमचा नंबर स्क्रीनवर आला की आत जा आणि काम करून घ्या. यामुळे गर्दी पण कमी होणार आणि काम पण लवकर होणार.
आधी एखाद्या छोट्या कंपनीला किंवा NGO ला आधार व्हेरिफिकेशन करायचं असेल तर खूप मोठी प्रोसेस होती. महागडी मशीन घ्यावी लागायची.आता UIDAI ने नियम सोपे केले आहेत. ज्या कंपन्यांना कमी प्रमाणात आधार चेक करायचा आहे, त्या आता AUA आणि e-KYC एजन्सीच्या मदतीने थेट काम करू शकतात. त्यांना वेगळी यंत्रणा उभी करायची गरज नाही. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना आणि संस्थांना खूप फायदा होणार आहे आणि खर्च पण वाचणार आहे.
एखाद्या संस्थेला आधारचं काम करायची परवानगी हवी असेल तर आधी खूप फेऱ्या माराव्या लागायच्या. कागदपत्रं घेऊन ऑफिसला जावं लागायचं.आता UIDAI ने SWIK 2.0 नावाचं नवीन पोर्टल आणलं आहे. यावर सगळं काम ऑनलाईन होणार. संस्था घरबसल्या आपला अर्ज टाकू शकते. कागदपत्रं अपलोड करू शकते. सरकारी ऑफिसला जाण्याची गरजच नाही. सगळं काम पारदर्शक आणि फास्ट होणार.
UIDAI आपली वेबसाईट पण पूर्णपणे बदलत आहे. नवीन वेबसाईट एकदम आधुनिक असणार आहे. अंध लोकांसाठी स्क्रीन रीडर, मोठे फॉन्ट, कीबोर्डने चालवण्याची सुविधा असणार आहे.सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता वेबसाईट 13 भाषांमध्ये आहे, पण आता ती 23 भाषांमध्ये येणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मराठी भाषेत पण आधारची सगळी माहिती, फॉर्म मिळणार. देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला आपल्या भाषेत आधार समजणार.एकूणच UIDAI ने आणलेल्या या 5 सुविधांमुळे आधार वापरणं अजून सोपं होणार आहे. विशेषतः रेशनचा प्रश्न सुटल्यामुळे गरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






