मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank Of India) हैदराबादमधील सायबर सिक्युरिटी सेंटर ऑफ एक्सलन्स (CCOE) येथे इथिकल हॅकिंग लॅबचे (Ethical Hacking Lab) उद्घाटन केले. संभाव्य सायबर धोक्यांपासून बँकेच्या माहिती प्रणाली, डिजिटल मालमत्ता, चॅनेल इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी सायबर संरक्षण यंत्रणा तयार करणे हा या अनोख्या उपक्रमाचा उद्देश आहे.
एथिकल हॅकिंग लॅबचे उद्घाटन युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ए मणिमेखलै यांच्या हस्ते, कार्यकारी संचालक नितेश रंजन, रजनीश कर्नाटक आणि निधू सक्सेना यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
“युनियन बँक मोठ्या प्रमाणात डिजिटल उत्पादने स्वीकारत आहे. बँकेने आणलेल्या विविध नवनवीन उपक्रमांद्वारे डिजिटल सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयटी मालमत्ता वाढत्या प्रमाणात इंटरनेटच्या संपर्कात येत आहेत. हे लक्षात घेऊन आमच्या बँकेने सायबर इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी इथिकल हॅकिंग लॅबची स्थापना केली आहे. आमचा सायबर सुरक्षेचा प्रवास पुढे नेत असताना डिजिटल बँकिंग अनुभव अधिक सुरक्षित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.” असे ए मणिमेखलै म्हणाल्या.
हैदराबादमधील युनियन बँक सायबर सिक्युरिटी सेंटर ऑफ एक्सलन्स (CCOE), बँकेची सुरक्षा स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक सायबर सुरक्षा केंद्रे स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आणि नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी सायबर संरक्षण उद्योग, सरकारी संस्था इत्यादींशी सहकार्य करत आहे.