Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Union Budget 2027-28 Preparation Begins: केंद्र सरकारने २०२७-२८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पीय परिपत्रक जारी करून विविध मंत्रालये आणि सरकारी विभागांकडून पुढील आर्थिक वर्षातील खर्चाची माहिती मागवली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 30, 2026 | 06:50 PM
Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बजेट 2027-28 ची तयारी सुरू
  • 12 ऑक्टोबरपासून अर्थसंकल्पपूर्व बैठका
  • 1 फेब्रुवारी 2027 रोजी अर्थसंकल्प सादर होणार
Union Budget 2027 News: देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. जगभरातील आर्थिक परिस्थिती, महागाईचा वाढता दबाव आणि देशातील विकासाच्या गरजा यांचा विचार करून केंद्र सरकारने २०२७-२८ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. येत्या १२ ऑक्टोबरपासून अर्थसंकल्पापूर्वीच्या महत्त्वाच्या बैठका सुरू होणार आहेत. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२७ रोजी देशासमोर नवीन अर्थसंकल्प मांडला जाईल.

अर्थ मंत्रालयाने याबाबतचे अर्थसंकल्पीय परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विविध मंत्रालये आणि सरकारी विभागांकडून पुढील वर्षासाठीच्या खर्चाची माहिती मागवण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आकडेवारी ६ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प माहिती प्रणालीमध्ये जमा करावी लागणार आहे.

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता

१२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बैठकींमध्ये प्रत्येक मंत्रालयाच्या खर्चाचा बारकाईने विचार केला जाणार आहे. कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा, कुठे खर्च वाढवण्याची गरज आहे आणि कुठे खर्चावर नियंत्रण ठेवता येईल, यावर चर्चा होईल. या बैठका नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. सरकारसमोर उपलब्ध असलेला महसूल आणि आगामी काळातील गरजा लक्षात घेऊन मंत्रालयांना खर्चाची मर्यादा ठरवली जाईल. त्यामुळे प्रत्येक विभागाला आपल्या योजनांसाठी किती पैसा मिळू शकतो, याचे चित्र हळूहळू स्पष्ट होईल. Union Budget 2027-28 Preparation Begins:

२०२७-२८ च्या संभाव्य खर्चाचा आराखडा

या प्रक्रियेत केवळ नवीन अंदाज तयार केले जाणार नाहीत, तर चालू आर्थिक वर्षातील खर्चाचाही आढावा घेतला जाईल. विविध विभागांनी दिलेल्या आकडेवारीची तपासणी केल्यानंतर २०२६-२७ च्या सुधारित अंदाजासोबत २०२७-२८ च्या संभाव्य खर्चाचा आराखडा तयार केला जाईल.

BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना

यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार वाढवणे आणि देशातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात. रस्ते, आरोग्य, विकास प्रकल्प आणि इतर मूलभूत सुविधांसाठी अधिक निधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. करांमध्ये झालेल्या बदलांनंतर आर्थिक हालचालींना आणखी चालना देण्यावरही लक्ष दिले जाऊ शकते.

अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प असेल. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग दहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता सरकार कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करते आणि त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NSE IPO Big Update : NSE IPO ची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एसबीआय विकणार आपली हिस्सेदारी; शेअर बाजारात मोठी हालचाल

Web Title: Union budget 2027 28 preparation begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Business News
  • Economic News

संबंधित बातम्या

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई
1

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी
2

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा
3

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा

National Entrepreneurship Networkच्या अध्यक्षपदी मनीष दलाल; AI, SaaS आणि Cloud क्षेत्रातील 25 वर्षांच्या अनुभवाचा फायदा
4

National Entrepreneurship Networkच्या अध्यक्षपदी मनीष दलाल; AI, SaaS आणि Cloud क्षेत्रातील 25 वर्षांच्या अनुभवाचा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.