डोळे वटारणारा देश नरमला; आर्थिक प्रगतीसाठी वापरणार भारतीय युपीआय पेमेंट प्रणाली!
गेल्या वर्षी भारतासाठी डोळे वटरणारा मालदीव आता काहीसा नरमला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. मालदीवने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे केवळ भव्य स्वागतच केले नाही तर अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. यापैकी एक महत्वाचा करार युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) शी संबंधित आहे. UPI द्वारे तुम्ही आम्ही मोबाईलद्वारे अत्यावश्यक गोष्टींसाठी पेमेंट करतो. या करारानंतर आता मालदीवमध्येही नागरिक UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहे. सध्याच्या घडीला अनेक देश भारतीय UPI प्रणालीचा वापर करत आहेत.
जयशंकर यांची ‘एक्स’ पोस्टद्वारे माहिती
मालदीवमध्ये डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाला. याबाबत जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली आहे. तत्पूर्वी, जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी भारतातील UPI ने डिजिटल व्यवहारात कशी क्रांती घडवून आणली आहे, याबाबत त्यांनी माहिती जाहीर केली आहे.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)
I am pleased to witness with External Affairs Minister @DrSJaishankar the Exchange of the MoU between Ministry of Economic Development and Trade of Maldives and National Payments Corporation of India (NPCI). The MoU will amplify the international finance opportunities, attracting… pic.twitter.com/r7FFwYcZQD — Moosa Zameer (@MoosaZameer) August 9, 2024
हेही वाचा : नोकरी सोडा… स्टार्टअप सुरू करा; सरकार देणार महिना 25000 रुपये; वाचा… काय आहे ‘ही’ योजना!
डिजिटल इनोव्हेशन आणण्यास मदत होणार
मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी यावेळी सांगितले की, “दोन्ही देशांमधील UPI करारामुळे मालदीवमध्ये डिजिटल इनोव्हेशन आणण्यास मदत होणार आहे. यूपीआय सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम येथील पर्यटनावरही दिसून येईल. UPI सेवा सुरू झाल्यामुळे लोक तात्काळ पेमेंट करू शकतील, ज्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळेल.”
‘या’ देशांमध्ये सेवा आधीच कार्यरत
UPI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने विकसित केले आहे. UPI च्या वापरामुळे मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतात. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात त्वरित पैसे पाठवू शकतात. भारताची UPI सेवा अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये भूतान, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर आणि यूएई यांचा देखील समावेश आहे. अशातच आता या यादीत मालदीवचाही समावेश झाला आहे.