(फोटो सौजन्य: Instagram
आपला चेहरा हा आपली ओळख असतो. पण जेव्हा यावर डाग, मुरुमे येतात तेव्हा आपलाच चेहरा आपल्याला पाहताना त्रास होऊ लागतो. सुंदर, निखळ त्वचेचं स्वप्न सर्वांचच असत पण यावर येणाऱ्या त्वचेच्या समस्या आपल्या आनंदाच्या आड येत असतात. वयानुसार, चेहऱ्यामध्ये बदल होणे सामान्य आहे. अनेक लोक आपल्यावरील डाग दूर करण्यासाठी बाजारीतील ब्यूटी प्रोडक्ट्सची मदत घेऊ पाहतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा पर्याय आपल्या चेहऱ्यासाठी घातक देखील ठरु शकतो. अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो जो आपल्या त्वचेला खराब करु शकतो. याउलट तुम्ही घरच्या घरी एक सोप्या आणि घरगुती उपायाने आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमे दूर करु शकता.
अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरुनही जर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला काहीच फरक जाणवत नसेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी तयार होणाऱ्या एक ड्रींकविषयीची माहिती देत आहोत, ज्याचे सेवन निरोगी त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते. याचे नियमित सेवन करताच आपल्याला आपल्या त्वचेत लक्षणीय बदल जाणवू लागेल. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही या ड्रिंकचा आपल्या आहारात समावेश करु शकता. हे तुमच्या त्वचेसाठी तसेच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हा उपाय प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर डॉली शाह यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चला तर मग हा काय उपाय आहे ते जाणून घेऊया.
साहित्य
महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल
बनवण्याची पद्धत
हे ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि यात केशराचे तुकडे घाला. जेव्हा पाण्याचा रंग हलका बदलू लागेल तेव्हा यात थोडे किसलेलं आलं, वेलची आणि अर्धा चमचे तूप घाला. यानंतर यात ज्येष्ठमध पावडर घाला आणि सर्वकाही नीट मिसळून घ्या. पाणी थोड थंड करा आणि मग गाळून एका ट्रेमध्ये टाकून त्याला गोठवून ठेवा. तयार बर्फाचे तुकडे कोमट पाण्यात मिसळून रोज याचे सेवन करा. तुम्ही यात जटामांसी पावडरचाही समावेश करु शकता, याने चेहऱ्याला नक्कीच फायदा होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.