Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Financial Partnership: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबत भागीदारी, ग्राहकांना थ्री-इन-वन खातेसुविधा मिळणार

आज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ने ॲक्सिस सिक्युरिटीजसोबत धोरणात्मक भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. उभय वित्तसंस्थांच्या भागीदारीमुळे बँकेला आपल्या ग्राहकांना एंड-टू-एंड ट्रेडिंग सेवा येईल.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 26, 2025 | 04:09 PM
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबत भागीदारी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबत भागीदारी

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्कर्ष SFB आणि अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजची भागीदारी
  • ग्राहकांना मिळणार थ्री-इन-वन खातेसुविधा
  • आता बचत, डीमॅट आणि ट्रेडिंग सर्व एका खात्यात
 

Financial Partnership: आज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ने ॲक्सिस सिक्युरिटीजसोबत धोरणात्मक भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. उभय वित्तसंस्थांच्या भागीदारीमुळे बँकेला आपल्या ग्राहकांना एंड-टू-एंड ट्रेडिंग आणि गुंतवणूकीबाबतच्या अत्याधुनिक सेवा प्रदान करता येणार आहेत. तसेच आपल्या ग्राहकांना भविष्यकालीन वित्तीय योजना सादर करण्यासाठी आपल्या सध्याच्या क्षमतांचा विस्तार करण्याच्या दिशेने बँकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

उभय वित्तसंस्थांतील या भागीदारीमुळे ग्राहकांना थ्री-इन-वन स्वरुपातील विशेष खाते योजनेचा लाभ घेता येणार आहे. या खात्यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसोबत बचत खाते आणि अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबत डीमॅट आणि ट्रेडिंग खाते अशी तिहेरी सुविधा एकत्रपणे ग्राहकांना दिली जाणार आहे. ग्राहकांना बँकिंग सेवा त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी सोयीस्कर आणि व्यापक व्यासपीठ प्रदान करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : ITR Refund Delayed: आयटीआर परतावा अडकला? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी परतफेडी विलंबा मागची खरी कारणे जाणून घ्या

बचत आणि चालू खाते, ठेवी, कर्जे, विमा आणि गुंतवणूकीबाबतच्या योजनांसह वित्तीय सेवांचे संपूर्ण प्रकार ग्राहकांना सादर करण्याच्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या धोरणांशी ही भागीदारी अतिशय मिळतीजुळती आहे. ॲक्सिस सिक्युरिटीजच्या मदतीने बँकेला आपल्या असंख्य ग्राहकांना शाखा, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पूरक सेवा यासारख्या अनेक माध्यमांद्वारे बँकिंग आणि गुंतवणूकीबाबतची सेवा एकत्रित आणि अखंडपणे देता येणार आहे.

ट्रेडिंग क्षेत्रात अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजच्या खासियतमुळे बँकेच्या ग्राहकांना प्रगत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. तसेच लवचिक ब्रोकरेज योजनांचा लाभ मिळणार आहे आणि गुंतवणूकीबाबत सखोल संशोधनरुपी माहितीसुध्दा वेळोवेळी मिळणार आहे. गुंतवणूक अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात ग्राहकांना मदत करण्याच्या हेतुने अ‍ॅक्सिसने गुंतवणूकीचे हे विश्व साकारलेले आहे. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरविणे, योजनांची निवड करण्याची संधी देणे आणि सक्षम असे आर्थिक भविष्य घडवण्याचा आत्मविश्वास या सहकार्यातून मिळतो.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोविंद सिंग यांनी या भागीदारीबद्दल टिप्पणी करताना म्हणाले, “उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना संपुर्ण आर्थिक योजना प्रदान करण्यासाठी सदैव वचनबद्ध आहे. अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे आमच्या सेवा आणखी आकर्षक आणि परिपुर्ण झाल्या आहेत. तसेच निरंतर गुंतवणूक करण्याची आणि स्वतःसाठी आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास ग्राहकांना ही भागीदारी पाठबळ देत आहे. आम्ही विविध श्रेणीतील ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि त्यांचा बँकिंग सेवांबाबतच अनुभव आणखी संपन्न करण्यासाठी ही भागीदारी केलेली आहे.”

हेही वाचा : Reliance Industries Share: रिलायन्स शेअरला जबरदस्त तेजी! गुंतवणूकदारांसाठी ‘जॅकपॉट’..; थेट 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ प्रणव हरिदासन या अनोख्या सहकार्याबद्दल भाष्य करताना म्हणाले, “उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी करण्यास आणि त्यांच्या ग्राहकांना आमच्या गुंतवणूक आणि ट्रेडिंगविषयक विविध योजना सादर करण्यास खूप उत्सुक आहोत. तंत्रज्ञानावर आधारलेला आमचा मंच, गुंतवणूक संशोधनाबाबत आमचा असलेला हातखंडा आणि विविध स्वरुपातील योजनांआधारे आम्ही गुंतवणूकीची प्रक्रिया खूप सोपी केलेली आहे. तसेच तिला खास दृष्टीकोनाची जोड देत ती अधिकाधिक सुलभ बनवण्याचे उद्दिष्टही ठेवलेले आहे. या दीर्घकालीन भागीदारीतून ग्राहकांना अर्थपूर्ण मूल्य देत राहणे, हा आमचा दृष्टीकोन आहे.”

सूक्ष्म-बँकिंग कर्ज (जेएलजी कर्ज), एमएसएमई कर्ज, गृहकर्ज आणि मालमत्तेवर आधारित कर्जासारख्या योजना ग्राहकांना प्रदान करण्याबरोबरच वंचित आणि सेवेपासून दूर असलेल्या समाजातील घटकांसुध्दा वित्तीय सेवा देण्यावरसुध्दा उत्कर्ष एसएफबीएलने आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. टॅब्लेट-आधारित ‘डिजी ऑन-बोर्डिंग’ सारख्या सहाय्यक सेवा प्रारुपाव्दारे बँक सोयीस्कर आणि सुटसुटीत पध्दतीने डिजिटल सुविधा देत असल्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष शाखेत न जाता ऑनलाईन पध्दतीने आपले खाते उघडता येते.

Web Title: Utkarsh small finance bank axis securities financial partnership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?
1

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
2

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट
3

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता
4

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.