Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

आधी पेट्रोल पंपातील ५० टक्के भागीदारीचे स्वप्न दाखवले, नंतर काही महिने नफ्याची रक्कम देऊन विश्वासही जिंकला. मात्र, मोठी रक्कम हातात येताच सगळेच बदलले. घर गहाण ठेवून आणि सोनं मोडून उभे केलेले तब्बल २ कोटी ४७ लाख रुपये हडपल्याचा आरोप झाल्याने हडपसरमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 13, 2026 | 03:11 PM
आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

Follow Us
Follow Us:
  • ५० टक्के पेट्रोल पंप भागीदारीचे आमिष
  • घर गहाण, सोनं मोडून २.४७ कोटी जमा
  • नफा दिल्यानंतर आरोपींकडून मुद्दलही हडप
 

पुणे : पेट्रोल पंप व्यवसायात ५० टक्के भागीदारी आणि भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ६९ वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार हडपसरमध्ये समोर आला आहे. सुरुवातीला काही काळ नफ्याची रक्कम देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी मोठी रक्कम हडपल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घर गहाण ठेवून, सोनं मोडून पैसे उभे केले

मोहन दगडू मोरे (वय ६९, रा. श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुणवाल सेहगल सोसायटी, हांडेवाडी रोड) आणि कालिदास विजय मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद लाहोटी आणि कालिदास मगर यांनी सय्यदनगर (हडपसर) आणि वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ‘मगर फ्यूल स्टेशन’ या पेट्रोल पंपाचे आपण भागीदार असल्याचे मोरे यांना सांगितले. या व्यवसायात ५० टक्के शेअर्सची गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.

हेही वाचा: Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; ७०-८० तरुणींच्या दाव्याने नालासोपारा हादरला

सुरुवातीला नफा दिला अन् विश्वास बसवला

आरोपींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मोरे यांनी स्वतःचे घर गहाण ठेवले. तसेच घरातील सोन्याचे दागिने मोडून पैसे उभे केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपये आरोपींच्या तसेच पेट्रोल पंपाशी संबंधित खात्यांमध्ये जमा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणुकीचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी सुरुवातीला काही महिने मोरे यांना नफ्यापोटी ठराविक रक्कम परतावा म्हणून दिली. त्यामुळे त्यांचा आरोपींवरील विश्वास आणखी वाढला.

मोठी रक्कम मिळताच मुद्दलही थांबवले

मोठी रक्कम हातात आल्यानंतर आरोपींनी मात्र मूळ मुद्दल आणि लाभांश देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने मोरे यांनी चौकशी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी काळेपडळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आनंद लाहोटी आणि कालिदास मगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करीत आहेत.

Web Title: Hadapsar petrol pump investment fraud 2 47 crore sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Business News
  • Fraud Case
  • Hadapsar
  • petrol pump

संबंधित बातम्या

Vedanta Nand Ghar : वेदांताच्या ‘नंद घर’ मोहिमेने बदलले लाखो कुटुंबांचे चित्र; पोषण अभियानातील उल्लेखनीय कामगिरी
1

Vedanta Nand Ghar : वेदांताच्या ‘नंद घर’ मोहिमेने बदलले लाखो कुटुंबांचे चित्र; पोषण अभियानातील उल्लेखनीय कामगिरी

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य
2

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…
4

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.