रिलायन्स शेअरला जबरदस्त तेजी! गुंतवणूकदारांसाठी 'जॅकपॉट' (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
Reliance Industries Share: भारतीय शेअर बाजारात कायम चढ-उतार सुरूच असतो. मात्र, रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना ‘जॅकपॉट’ लागला असून शेअर तेजीने उभारी घेत आहे. या चर्चित स्टॉकच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारात 44 लाख गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक संकेत असून सलग दुसऱ्या दिवशीही शेअर अग्रेसर आहे.
भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्वेसर्वा आणि अब्जाधीश मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजारात मोठा धमाका असून मंगळवारी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय स्थिरता दिसली, परंतु, RIL ने अचानक 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप घेत गुंतवणूकदारांना ‘जॅकपॉट’ मिळवून दिले. गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांची निराशा झाली होती. मात्र, यावर्षी यात लक्षणीय वाढ होताना दिसत असून येत्या काळात शेअरमध्ये वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी ‘गुडन्यूज’
मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 1,559.60 रुपयांच्या उच्चांकावर झेप घेतली असून बुधवारीही या स्टॉक तेजीच्या मार्गावर आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म JPMorgan यांनी रिलायन्सच्या शेअर्सला ओव्हरवेट रेटिंग दिल्याने या स्टॉकमध्ये वाढ झाली असून 2026 च्या आर्थिक वर्षासाठी सकारात्मक अंदाज दर्शवला आहे. येत्या वर्षी RIL शेअर 11% पर्यंत वाढून 1,727 रुपयांची किंमत निश्चित करू शकतो.
गेल्या सहा महिन्यांत RIL च्या गुंतवणूकदारांना सुमारे 8 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला असून गेल्या महिन्यात तर, RIL शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये YTD परताव्यात 27% वाढ झाली असून ही कामगिरी रिलायन्सचे मूल्यांकन अधिक आहे. जेपी मॉर्गन यांच्या मते, रिटेलमधील अव्हेन्यू सुपरमार्ट्स आणि टेलिकॉममध्ये भारती एअरटेल कंपन्यांच्या तुलनेत RIL अधिक आकर्षक आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स इतर होल्डिंग कंपनीच्या सवलतीत 15% स्वस्त दराने कमी असून RIL मध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या कामगिरीमुळे रिलायन्सच्या उत्पन्नात दबाव आल्याने घट झाली होती. मात्र, आता ही घसरण थांबली असून भविष्यात सुधारणा आणि वाढ होणे अपेक्षित आहे. आणि, रिलायन्स इंडस्ट्रीजची भविष्यात आणखी सुधारण्याची आणि अपग्रेड वाढवण्याची क्षमता आहे.
काही परदेशी ब्रोकरेज; 2026 साठी जिओचा आयपीओ, टेलिकॉममध्ये अपेक्षित वाढ, नवीन ऊर्जा प्रकल्पांमधील वाढ आणि किरकोळ व्यवसायातील वाढ यांसारखे प्रमुख ट्रिगर्स रिलायन्सकडे असल्याचे म्हणणे आहे.
टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.






