Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलायन्स ऑटोमोबाईल क्षेत्रात का नाही? ‘हे’ आहे कारण

एनर्जी, रिटेल, ऑईल रिफायनरी अशा अनेक उद्योग क्षेत्रात असणारी रिलायन्स इंडस्ट्री ऑटोमोबाईल क्षेत्रात का बर दिसून येत नाही? मुकेश अंबानी गाड्या का विकत नाहीत? चला तर मग जाणून घेऊयात, काय आहे नेमकं कारण?

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 02, 2024 | 08:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील दिग्गज इंडस्ट्रीज मधील एक आहे. विविध क्षेत्रात आपले जाळे या कंपनीने पसरले आहे. हे जाळे फार विशाल आहे. फक्त देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे जाळे पसरले आहे. या जाळ्याची विशालता पेट्रोल इंडस्ट्रीज, ऑइल रिफायनरी, रिटेल अशा विविध उद्योगात पसरले आहे. दरम्यान, रिलायन्स सारखी मोठी इंडस्ट्री वेगवेगळ्या क्षेत्रात आपले जाळे पसरवून आहे. परंतु, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये या कंपनीचे काहीच कसा नेटवर्क नाही? असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. ते स्वाभाविक आहे, विविध क्षेत्रांमध्ये आपला इतका मोठा साम्राज्य उभे करणारे मुकेश अंबानी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये का नाही येत? हा प्रश्न फक्त तुम्हालाच नव्हे तर अनेक जणांना पडला आहे. त्याला तसे कारणही असल्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात नक्की काय आहे रिलायन्सचे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये पाऊल न ठेवण्याचे कारण.

हे देखील वाचा : Hyundai ने रिलीज केला 3-रो इलेक्ट्रिक SUV Ioniq 9 चे टीझर, नोव्हेंबरमध्ये होणार लाँच

रिलायन्सचा मुख्य मॉडेल बिझनेस टू बिझनेस आहे. रिलायन्स इंडस्ट्री व्यावसायिक टू व्यावसायिक व्यापार करण्यास जास्त पसंती देते. परंतु, ऑटोमोबाईल क्षेत्रात तसे नाही आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये व्यावसायिकाचा थेट संबंध ग्राहकांशी होतो. तसेच कार किंवा बाईक घेण्यासाठी खिशात लाखो रुपये असणे गरजेचे असते. जर तुम्हाला एखादी कार घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान पाच लाख असणे आवश्यक असते. तर त्यात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मागणी कमी आणि सप्लाय जास्त आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीज ज्या क्षेत्रांमध्ये आहे त्या क्षेत्रांमध्ये मागणी जास्त आहे परंतु पुरवठा त्यामानाने कमी आहे.

ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फक्त गाड्या विकणे इतकेच नसते. तर त्यांची डेव्हलपमेंट करणे, स्ट्रक्चर डिझाईन करणे, मॅन्युफॅक्चर करणे, तसेच त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामध्ये व्यवसायिकांना फार मोठा खर्च होतो. कदाचित, ऑटोमोबाईल क्षेत्रावर पैसे लावण्या पेक्षा इतर क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवणे जास्त सोयीस्कर ठरत असल्याने रिलायन्स ऑटोमोबाईल क्षेत्रात दिसून येत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. या क्षेत्रामध्ये आधीपासून बहुतेक अशा इंडस्ट्रीज आहेत, जे या क्षेत्रात आधीपासून अधिपत्य गाजवत आहेत.

हे देखील वाचा : एसयूव्ही सुद्धा देईल जबरदस्त मायलेज, आजच फॉलो करा ‘या’ Driving Tips

टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझुकी अशा अनेक कंपन्या आहेत. या स्पर्धेमध्ये पैसे आणि वेळ व्यर्थ करण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रात आणखीन भरारी घेण्यावर रिलायन्स जास्त भर देत असेल. तसेच ज्या क्षेत्रावर ऑटोमोबाईल क्षेत्र अवलंबून आहे ते म्हणजे एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी तसेच बॅटरी या व्यवसायात रिलायन्स आधीपासून आहे त्यामुळे रिलायन्स या क्षेत्रामध्ये येण्यापासून आणि स्वतःशीच स्पर्धा टाळण्यासाठी कदाचित ऑटोमोबाईल क्षेत्रात दिसून येत नाही.

Web Title: Why reliance dont manufacturing cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 08:09 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • Reliance Industries

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.