Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Young Entrepreneur Success Story : 12 वीत शिकणारा मुलगा AI कंपनीचा मालक; वडिलांना स्वतःच्या कंपनीत दिली 2 लाखांची नोकरी

Young Entrepreneur Success Story :वय अवघे १६ वर्षे आणि शिक्षण १२ वी इयत्तेत... पण या वयात जिथे मुले करिअरचा विचार करतात तिथे या मुलाने स्वतःची कंपनी उभी केली आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या वडिलांनाच कंपनीत कामावर ठेवून त्यांना महिन्याला २ लाख रुपये पगार देण्यास सुरुवात केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 05:35 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 12 वीत शिकणारा मुलगा AI कंपनीचा मालक
  • वडिलांना स्वतःच्या कंपनीत दिली 2 लाखांची नोकरी
  • कसा सुरु केला स्टार्टअप?
Young Entrepreneur Success Story : लहानपणी खेळणं बागडणं या पलीकडे आपण फक्त दंगा केलाय. पण आताची पिढी फार वेगळी आहे. बऱ्याच मुलांना त्यांचं भविष्य स्पष्ट माहिती आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांना नेमकं काय करायचं हे स्पष्ट माहिती आहे. वयाच्या १६ व्या वर्षी, जेव्हा बहुतेक मुलांना आपण काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याची खात्री नसते, तेव्हा केरळचा राऊल जॉन अजू याने AI स्टार्टअप सुरु केला. त्याच्यासोबत त्याचे १५ कर्मचाऱ्यांसह आहेत. मुख्य म्हणजे त्यानेकंपनीत त्याच्या वडिलांना नोकरी दिली आहे. ज्यासाठी तो त्यांना दर महा २ लाख रुपये पगारही देतो. ऐकून धक्का बसला ना… चला तर मग जाणून घेऊयात एवढ्याश्या वयात त्याने एवढं मोठा निर्णय कसा घेतला आणि कसं उभारलं त्याचं हे साम्राज्य. ( Young Entrepreneur Success Story ) 

Swiggy IRCTC Food Order : अरे वा! खरंच? आता ट्रेन नंबर टाकताच मिळणार आवडीचं जेवण; Swiggy ने आणलं नवं फीचर

12 वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने १५ हून अधिक AI टूल्स विकसित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या कंपनीत काम करण्यासाठी वडिलांना दरमहा २ लाख रुपये देतो आणि त्याने जवळपास ५ लाख विद्यार्थ्यांनादेखील प्रशिक्षणही दिले आहे. या मिळालेल्या यशानंतरही तो म्हणतो की लोकांकडून शिकण्यातूनच सर्वात मोठे धडे मिळतात.

कसा सुरु केला स्टार्टअप?

राऊलचा AI प्रवास त्याच्या नवव्या वर्षाचा असल्यापासून सुरु झाला. ॲडोबीमध्ये त्याचे वडिल नोकरीला होते. त्यामुळे उच्च दर्जाचं तंत्रज्ञान त्याला सुरुवातीपासूनच ओळखीचं होतं. ही उच्च दर्जाची तांत्रिक उपकरणे वापरण्याची संधी त्याला सुरुवातीपासूनच मिळाली होती. ज्यामुळे त्याला तंत्रज्ञान क्षेत्रातील उपयोग, कार्ये आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची ओळख झाली. त्यानंतर त्याने एआय बद्दल हळूहळू शिकायला सुरुवाती केली. त्याचा इंट्रेस वाढत गेला. त्याने सर्चबद्दल शिकायला सुरुवात केली. या गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. हळूहळू, त्याने एआयच्या शक्यतांवर प्रयोग करण्यास सुरुवात केले. तिथूनच त्याने आपला एआय स्टार्टअप सुरू केला.

‘मीबॉट’ नावाच्या रोबोटमध्ये इंट्रेस्ट वाढला

पुढे १२ वर्षांचा होईपर्यंत, त्याची उत्सुकता वाढली. त्याला ‘मीबॉट’ नावाच्या रोबोटमध्ये इंट्रेस्ट वाढला. त्याने शाळेच्या शैक्षणिक प्रकल्पासाठी बनवला होता. टेक्नॉलॉजीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याच्या ही सुरुवात होती. तेव्हापासून राऊलने मीबॉट, रेस्क्यू एआय, झॅपगॅप, इन्व्हेस्टो एआय आणि फीडफाय यांसारखी १५ हून अधिक AI उत्पादने विकसित करायला सुरुवात केली. या सर्व प्रकल्पांमध्ये, तांत्रिक प्रात्यक्षिकांऐवजी त्याने व्यावहारिक समस्या सोडवणारे टूल्स विसकीत करण्यावर विशेष भर दिला.

आता वडिलांचा पगार देतो

आज, १२वीत असतानाच, राऊल सुमारे १५ कर्मचाऱ्यांची एक स्टार्टअप कंपनी सांभाळतो. या कर्मचाऱ्यांपैकी एक त्याचे वडील आहेत, ज्यांना तो दरमहा २ लाख रुपये पगार देतो. ही व्यवस्था ऐकायला थोडी विचित्र वाटत असली तरीही राऊल याकडे उद्योगातील अनेक दशकांचा अनुभव असलेल्या व्यक्तीकडून शिकण्याची एक संधी म्हणून पाहतो.

अजू जोसेफ यांनी ॲमेझॉन, ॲडोबी, विप्रो आणि आयबीएम यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. राऊलचा विश्वास आहे की हा अनुभव एका रात्रीत किंवा फोनवर शिकता येत नाही. राऊल म्हणतो की, वडिलांसोबत काम केल्यामुळे त्याला टेक कंपन्या कशा चालतात आणि वाढतात हे समजण्यास मदत होते. त्याने गंमतीने असेही म्हटले की, कंपनीत वडिलांचे असणे हे “माझ्या मार्केटिंगसाठी चांगले आहे.”

Auto Taxi Fare Hike : मुंबईकरांना झटक्यावर झटके! वाढत्या महागाईत ऑटो, टॅक्सीच्या भाड्यातही वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू

Web Title: Young entrepreneur success story ai startup founder hires father in his company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business Idea
  • success tips
  • Youth

संबंधित बातम्या

ANNAMAI : शेतीत AI क्रांती; आयआयटी रोपरचे शक्तिशाली एआय सांगणार पिकांना पाणी अन् खत देण्याची अचूक वेळ
1

ANNAMAI : शेतीत AI क्रांती; आयआयटी रोपरचे शक्तिशाली एआय सांगणार पिकांना पाणी अन् खत देण्याची अचूक वेळ

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?
2

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
3

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
4

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.