Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : दहावी, बारावी परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द

यंदाच्या दहावी बारावी परीक्षेसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांचे अदलाबदली रद्द करणार असल्याचे आदेश दोन दिवसात काढणार आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 23, 2026 | 07:59 PM
Kolhapur News : दहावी, बारावी परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द
Follow Us
Close
Follow Us:
  • परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय
  • कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द
गडहिंग्लज : यंदाच्या दहावी बारावी परीक्षेसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांचे अदलाबदली रद्द करणार असल्याचे आदेश दोन दिवसात काढणार आहेत. असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त सह विचार सभा पुणे येथे झाली. अध्यक्षस्थानी राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी होते. या बैठकीत यंदाच्या दहावी, बारावी परीक्षेसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांचे अदलाबदली रद्द करावे, अशी मागणी राज्य मुख्याध्यापक महामंडळाने केली. त्यावर अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यंदाच्या दहावी बारावी परीक्षेसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांचे अदलाबदली रद्द व्हावी, अशी मागणी महामंडळाच्या वतीने सातत्याने लावून धरण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत दोन दिवसात आदेश काढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील पंडित, डी एस घुगरे, सचिव नंदकुमार सागर, विद्या समिती सचिव संजय कुमार झांबरे, महेंद्र गणपुले, कोल्हापूर विभाग अध्यक्ष बी बी पाटील, सुधाकर जगदाळे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार सचिव आर. वाय. पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड, सांगली जिल्हा सचिव संतोष नाईक, बेरड, अहमदनगर, पुंडलिक मेमाणे आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला मोठा धक्का! ‘आधी बढती, नंतर टीईटी’ हा पर्याय फेटाळला

बैठकीतील निर्णय

  • बोर्ड परीक्षेच्या सर्व प्रकारच्या मानधनात दहा ते पंधरा टक्के वाढ होणार
  • बोर्डाच्या कामकाजाची माहिती सर्वांना व्हावी. यासाठी एसओपी तयार करून मार्गदर्शक पुस्तिका शाळांना देणार
  • मुख्याध्यापकांवर विविध जबाबदारी असल्याने त्यांना पेपर तपासणीतून वगळण्यासाठी सकारात्मक विचार करणार
  • मान्यता प्राप्त शिक्षकांनाच पेपर तपासणीसाठी देणार, संस्था मानधन तत्वावर असलेल्या शिक्षकांना पेपर तपासणीच्या कामातून वगळणार.
  • कस्टडीपासून शाळेपर्यंत प्रश्नपत्रिका वाहतूक करताना पोलिस अथवा होमगार्डचे संरक्षण देणार.
  • 1000 पेक्षा जादा विद्यार्थी संख्या असणाऱ्या केंद्रांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देणार,
    उत्तर पत्रिका पोस्ट खाच्याच्या केंद्रावरून घेऊन जाणार

जुन्या शाळांना कायमस्वरूपी संकेतांक

विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्र देण्यात येणार असून सुरक्षा मानकासह क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन शाळांना मंडळ सांकेतांक देताना फक्त पहिल्या वर्षी शाळेची तपासणी होईल. पुढील चार वर्षे ही मान्यता ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. जुन्या शाळांना कायमस्वरूपी संकेतांक मान्यता देण्याबाबतची कार्यवाही लवकर सुरू करण्यात येईल,. सीसीटीव्ही बाबतीत शाळा व संस्थानी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी केले.

कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द होणार; शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह

Web Title: 10th 12th kolhapur news big decision on the demand of the principals corporation for the examination exchange of employees will be canceled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • education news
  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

आता दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सुरक्षेत मोठी वाढ! राज्यस्तरीय दक्षता समिती होणार स्थापन
1

आता दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सुरक्षेत मोठी वाढ! राज्यस्तरीय दक्षता समिती होणार स्थापन

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती
2

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती

Education News : शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय
3

Education News : शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.