फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल हैड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशनने भरतीच्या प्रक्रियेला आयोजित केले आहे. या भरतीच्या माध्यमातून ११८ पदांसाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. विविध विभागांतील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये HR विभागातील ट्रेनी ऑफिसरची ७१ पदे, PR विभागातील ट्रेनी ऑफिसरची १० पदे, लॉ विभागातील ट्रेनी ऑफिसरची १२ पदे तर सिनियर मेडिकल ऑफिसरच्या एकूण २५ रिक्त पदांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, यामध्ये या भरती विषयक सखोल माहिती पुरवण्यात आली आहे.
मानव संसाधन/ मानव संसाधन व्यवस्थापन/ मानव संसाधन व्यवस्थापन आणि श्रमिक संबंध/ औद्योगिक संबंध/ वैयक्तिक व्यवस्थापन इत्यादी विषयांमध्ये दोन वर्षीय पूर्णकालिक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्राप्त केलेले उमेदवार ट्रेनी ऑफिसर (एचआर) पदासाठी अर्ज करू शकतात. ट्रेनी ऑफिसर (पीआर) पदासाठी कम्युनिकेशन/ मास कम्युनिकेशन/ पत्रकारिता/ पब्लिक रिलेशनस मध्ये प्रथम श्रेणीसह दोन वर्षीय पूर्णकालिक नियमित पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्राप्त केलेले अर्ज करू शकतात. ट्रेनी ऑफिसर (लॉ) पदासाठी भारतीय विश्वविद्यालय/बार काउंसिल ऑफ इंडिया द्वारा मान्यता प्राप्त संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह पूर्णकालिक नियमित लॉ डिग्री (व्यावसायिक) (3 वर्षीय एलएलबी) किंवा 5 वर्षीय एकत्रित कोर्स केलेले अर्ज करू शकतात.सीनियर मेडिकल ऑफिसर पदासाठी निर्धारित पात्रतेचा तपशील अधिसूचनेतून मिळवा.
ट्रेनी ऑफिसरच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ३० वर्षे आहे. तर सिनियर मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. वयोमर्यादे संबंधित अटी शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. उमेदवारांना डिसेंबरच्या ३० तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
तसेच वेतनमानाविषयी महत्वाची बातमी पुरवण्यात आली आहे. ट्रेनी ऑफिसर पदावर निवडलेल्यांना ५०,००० रुपये किमान वेतन देण्यात येईल, जो १,६०,००० रुपये पर्यंत वाढू शकतो. सीनियर मेडिकल ऑफिसर पदावर निवडलेल्यांना ६०,००० रुपये किमान वेतन मिळेल, जो १,८०,००० रुपये पर्यंत वाढू शकतो.