फोटो सौजन्य - Social Media
सरकारी क्षेत्रामध्ये काम करू पाहणार्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एकंदरीत, पोलीस दलामध्ये भरतीची प्रतीक्षा असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. पश्चिम बंगालमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी हालचाल केली जात आहे. पश्चिम बंगालच्या राज्य शासनाने या हालचालीला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या तब्बल १२,००० रिक्त पदांसाठी या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : सैन्यात अधिकारी पदाची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी खुशखबर; आता SSB परीक्षेचे प्रशिक्षण मिळणार मोफत
या भरतीमध्ये निवड होणाऱ्या बहुतेक उमेदवारांना सरकारी रुग्णालयांमध्ये स्थित केले जाईल. नुकतेच पश्चिम बंगालच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एक दुर्घटना घडली होती. एका नराधमाने ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या घटनेने ममता बॅनर्जीच्या राज्य शासनाने दखल घेत, वैद्यकीय महाविद्यालयांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यावर भर देत आहे.
या भरतीसंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २६ सप्टेंबर रोजी प्रेस कॉन्फरन्स घेतली. यादरम्यान या भरती संदर्भात माध्यमांशी चर्चा करण्यात आली. राज्य शासन या भरतीवर जोर देत असल्याविषयी सांगण्यात आले. यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या कि,”आम्ही ताबडतोब सगळीकडे सुरक्षा दल उपल्बध नाही करू शकत, परंतु यावर प्रयत्न चालू आहेत. आम्ही १२,००० सुरक्षा रक्षकांची भरती करवणार आहोत. भरती सप्टेंबरच्या ३० तारखेपर्यंत पूर्वर्णत्वास येईल. यापुढे अगदी किंचित कालावधीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिली जाईल.” मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मते उमेदवारांना तीन ते सहा महिन्यांसाठी ट्रेनिंग दिली जाईल आणि राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरक्षेच्या हेतूने तैनात केले जाईल.
हे देखील वाचा : रक्कम लाखोंची येईल खिशात, फिरून देशविदेशात; बेस्ट करिअर ऑप्शन
पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सुरक्षेवर काळजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे कि,” फक्त १,५१४ खाजगी ट्रेंड सुरक्षा गार्डांची भरती करून घेणे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पूर्ण सुरक्षा निश्चित करत नाही. विशेषतः रुग्णालयातील एक सिव्हिक व्हॉलंटीयटर एका ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करून तिच्यावर हत्या करतो ही बाब अतिशय खेदजनक आहे.” या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे.