
Maharashtra TET Scam: (फोटो- सोशलमीडिया)
TET Result Cancellation: शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET मध्ये जो घोटाळा झाला होता त्यावर अखेर हायकोर्टाने निकाल दिला आहे. 2018 आणि 2019 च्या TET मध्ये उत्तरपत्रिका बदलून मार्क वाढवल्याचा आरोप होता. या प्रकरणात कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती किशोर संत आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी हा निकाल दिला. शासनाने आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ज्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द केले होते ती कारवाई कोर्टाने बरोबर ठरवली आहे. पण त्यांना जी कायमची बंदी घातली होती की तुम्ही आयुष्यात परत परीक्षा देऊ शकत नाही, ती बंदी कोर्टाने काढून टाकली आहे. Maharashtra TET Scam:
कोर्ट म्हणालं, कोणालाही कायमची बंदी घालायची असेल तर आधी त्याला बोलण्याची संधी द्यावी लागते. त्याची बाजू ऐकून घ्यावी लागते. इथे तसं काहीच केलं नाही. थेट बंदी घातली. हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ती बंदी आम्ही रद्द करत आहोत. आता याचा अर्थ असा की त्या विद्यार्थ्यांचा जुना निकाल रद्दच राहील, पण ते भविष्यात परत TET ची परीक्षा देऊ शकतात. त्यांच्यासाठी दुसरा चान्स खुला झाला आहे.
कोर्टाने हे पण स्पष्ट केलं की बंदी उठवली म्हणजे तुम्ही निर्दोष झालात असं समजू नका. तुमच्यावर जो आरोप आहे तो अजूनही आहे. सरकार आणि परीक्षा परिषद तुमची चौकशी करू शकते. जर चौकशीत तुम्ही दोषी आढळलात तर तुमच्यावर परत कारवाई होऊ शकते. ज्या लोकांनी कोर्टापासून खरं लपवलं, ज्यांचं नाव पोलिसांच्या जबानीत होतं पण त्यांनी याचिकेत ते लपवलं, त्यांना मात्र या निकालाचा फायदा मिळणार नाही. त्यांच्यावर 3 ऑगस्ट 2022 ला जी कारवाई झाली होती ती तशीच राहील. त्यांच्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.
या निकालात सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आधीपासून नोकरीत असलेल्या शिक्षकांचा. TET सक्तीची झाल्यापासून अनेक जुने शिक्षक अडचणीत आले होते. यासाठी कोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या अंजुमन इशआत-ए-तालीम ट्रस्ट केसचा आधार घेतला. या केसचा निर्णय 29 मे 2026 ला आला होता.
BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
कोर्टाने सांगितलं की नोकरीत असलेल्या शिक्षकांना TET पास होण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत त्यांनी TET पास केली पाहिजे. जर या वेळेत पास झाले नाहीत तर त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते.
सध्या त्यांचा पगार आणि शालार्थ ID बंद करण्याचे आदेश जसे आहेत तसेच राहतील. सरकारला सांगितलं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी 31 डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करा.
ज्या शिक्षकांनी आधीच CTET किंवा TAIT किंवा दुसरी कोणती सरकारमान्य परीक्षा पास केली आहे, त्यांना घाबरण्याची गरज नाही. फक्त TET चा निकाल रद्द झाला म्हणून त्यांना नोकरीवरून काढता येणार नाही. पण जर त्यांच्यावर TET घोटाळ्याप्रकरणी फौजदारी केस किंवा दंडात्मक कारवाई चालू असेल तर त्यांना या निकालाने वाचवता येणार नाही.
Maha TET Exam Online: महा टीईटी परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑनलाईन …
या केस मध्ये याचिकाकर्त्यांकडून व्ही. डी. सपकाळ, एस. आर. सपकाळ, ए. आर. सय्यद, व्ही. एस. पानपट्टे या वकिलांनी बाजू मांडली. तर सरकारकडून व्ही. डी. होन, पी. एस. पाटील आणि परीक्षा परिषदेकडून ए. आर. निकम यांनी युक्तिवाद केला. थोडक्यात सांगायचं तर कोर्टाने सरकारची निकाल रद्द करण्याची कारवाई योग्य ठरवली पण कायमची बंदी चुकीची ठरवून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना परत एकदा संधी दिली आहे.