Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळांमध्ये होणार शुकशुकाट! ५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात देणार धडक

 53 वर्षांखालील सर्व शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक करण्यात आले असून अनेक वर्ष अध्यापण करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली आहे. याचपार्श्वभूमीवर शिक्षक विविध मागण्यांसाठी नागपूरच्या अधिवेशनात धडक देणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 08, 2025 | 02:12 PM
५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात धडक देणार (फोटो सौजन्य-Gemini)

५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात धडक देणार (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • विविध मागण्यांसाठी नागपूरच्या अधिवेशनात धडक देणार
  • 5 डिसेंबरला पुकारलेल्या एक दिवसीय शाळा बंद
  • 50,000 हून अधिक शिक्षक नागपूरात जाणार
राज्यातील तब्बल 50 हजार शिक्षक 10 डिसेंबरला नागपूर अधिवेशनात धडक देणार आहेत. ठाण्यासह राज्यातील शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. विद्याथ्यर्थ्यांच्या पटसंख्येनुसार लावण्यात आलेल्या शिक्षकांच्या संचमान्यता निकषांवर राज्यातील असंख्य शाळा बंद होऊन शिक्षक सरप्लस होणार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शिक्षक संघटना एकवटल्या असून त्यांनी 5 डिसेंबरला पुकारलेल्या एक दिवसीय शाळा बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्यभरातील किमान 50,000 हून अधिक शिक्षक विविध मागण्यांसाठी नागपूरच्या अधिवेशनात १० डिसेंबरला धडक देणार आहेत.

आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी नागपुरात ठिय्या मांडून शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधणार आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या जीआरमुळे आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद होणार असून असंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.शासनाच्या या धोरणामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणणारा १५ मार्च २०२४ चा शासकीय जीआर रद्द करून जुनी संच मान्यता धोरण राबवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल

कमी पटसंख्येच्या शाळांसाठी आंदोलन

२०१३ व्या शासन निर्णयापासून शिक्षक भरतीसाठी टीईटी धोरण लागू असतांना २०१३ पूर्वीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती अन्यायकारक असल्याने ती सक्ती रद्द करावी. यांसह एक नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, ठाणे जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र व पेसा क्षेत्रात काम करीत असलेल्या शिक्षकांना कोर्टाच्या आदेशानुसार एकस्तर वेतन श्रेणी विनाअट त्वरित लागू करणे, वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा ग्राह्य धरून त्यांना सेवेचे सर्व लाभ देणे, अशा अनेक मागण्यासाठी राज्यातील शिक्षक नागपूर अधिवेशनात धडक देणार असल्याचे शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष एकनाथ तारमळे, सुरेश विशे यांनी सांगितले आहे.

नाशिक येशील कुंभमेळ्यासाठी गांजा फुकणाऱ्या साधुसंतांसाठी चौदा हजार कोटी रुपये खर्च करायला तयार असणारे राज्य सरकार मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी व आदिवासी, गोरगरीब, शोषित, वंचित विद्याथ्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करू शकत नाही, हे चित्र महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे, असं मत भारती ठाणे जिल्ह्यातील शिक्षक, अध्यक्ष एकनाथ तारमळे यांनी व्यक्त केलं.

Career Options for Girls After 12th: बारावीनंतर मुलींसाठी उत्तम करिअरचे पर्याय!

Web Title: 50000 teachers to make a strong presence at the nagpur session on december 10 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur Winter session
  • Politics

संबंधित बातम्या

सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?
1

सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?

Maharashtra Weather : धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला! ‘या’ जिल्ह्यात तापमान 6.6 अंशावर, तुमच्या भागात काय परिस्थिती?
2

Maharashtra Weather : धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला! ‘या’ जिल्ह्यात तापमान 6.6 अंशावर, तुमच्या भागात काय परिस्थिती?

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
3

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत

Indigo फ्लाईटच्या गोंधळाचा नेत्यांनाही फटका; नागपूरच्या अधिवेशनाला पोहचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर
4

Indigo फ्लाईटच्या गोंधळाचा नेत्यांनाही फटका; नागपूरच्या अधिवेशनाला पोहचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.