Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यापीठात CORS स्टेशन उभारणार, GPS आधारित सर्वेक्षणात अचूकतेचा नवा टप्पा

आता विद्यापिठात लवकरच CORS स्टेशन्स उभारण्यात येणार असून तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे अचूकतेचा एक नवा टप्पा गाठण्यात येऊ शकतो

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 09, 2026 | 12:19 PM
आता मुंबई विद्यापिठात भू-स्थानिक धोरण अंमलबजावणी (फोटो सौजन्य - iStock)

आता मुंबई विद्यापिठात भू-स्थानिक धोरण अंमलबजावणी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • भू-स्थानिक धोरण अंमलबजावणी
  • आता विद्यापिठातही उभारले जाणार CORS स्टेशन्स
  • तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार 
मुंबईः देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई विद्यापीठ आणि भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ अंमलबजावणीच्या अनुषंगाने या कराराचे महत्व अधोरेखित होणार असून, याअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारण्यात येणार आहे.

CET च्या प्रवेश नोंदणीस सुरुवात; MCA व MHT-CET अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

अत्यंत महत्त्वाचा करार 

या सामंजस्य कराराअंतर्गत उभारण्यात येणारे सीओआरएस स्टेशन मुंबईसह पश्चिम विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर जीपीएस आधारित सर्वेक्षण, भू-मापन, मॅपिंग आणि स्थाननिर्धारण प्रक्रियेत अत्यंत उच्च अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, बांधकाम क्षेत्र, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. सीओआरएस स्टेशनमुळे सेंटीमीटर स्तरावरील अचूक स्थानिक माहिती रिअल टाइम स्वरूपात उपलब्ध होणार असून, याचा लाभ शासकीय विभाग, खासगी सर्वेक्षक, अभियंते, संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेषतः भूगोल, जिओ इन्फॉर्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संगणकीय अनुकूलन तसेच एआय/एमएल आधारित भू-स्थानिक संशोधनासाठी मुंबई विद्यापीठातील विद्याथ्यांना प्रत्यक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

सर्वेक्षण विभागामध्ये वारसा डेटा

कराराअंतर्गत विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधकांना भारतीय सर्वेक्षण विभागाकडे असलेला वारसा डेटा, स्थानिक व डिजिटल डेटा, सीओआरएस नेटवर्क तसेच विविध भू-स्थानिक सेवा राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ नुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भू-स्थानिक धोरण म्हणजे नक्की काय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर साधारण स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारे नकाशे आणि भू-स्थानिक माहितीचे उत्तम संसाधन नियोजन करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन असणे आणि स्थानिक समुदायाच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे हे धोरण. याशिवाय महसूल निर्मिती आणि मुद्रीकरणासोबतच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आधीपासूनच केली जात असून विविध कंपन्या घरामध्ये नवीन क्षमता निर्माण करत आहेत.

वडिलांचे स्वप्न केले साकार! पहिले बनली IPS मग IAS बनून बजावतेय महत्वाची भूमिका

संशोधन प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना संधी

संशोधनासाठी प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये विद्याथ्यांना व संशोधकांना संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ अंतर्गत सव्र्व्हे ऑफ इंडियाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शैक्षणिक व तांत्रिक सहाय्य देणे, सव्हें ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि विद्यापीठातील संशोधन विद्यार्थ्यांना सर्व्हे ऑफ इंडियाच्या मध्ये प्रशिक्षण देणे, यावरही या करारात भर देण्यात आला आहे.

Web Title: A cors station will be set up at the mumbai university marking a new level of accuracy in gps based surveys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Career News
  • Education News in Marathi
  • Mumbai University

संबंधित बातम्या

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक
1

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

 ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ मोहिमेची घोषणा; भारताला पुढील दशकात १० कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य
2

 ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ मोहिमेची घोषणा; भारताला पुढील दशकात १० कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…
3

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण
4

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.