फोटो सौजन्य - Social Media
मुद्राचे वडील पाच दशकांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. तोच वारसा पोरीकडे आला. पण पोरीने फक्त प्रयत्न केले नाही तर वडिलांचे स्वप्न पूर्णही केले. मुद्रा एका छोट्या गावखेड्यातून येते. अभ्यासात इतकी हुशार की दहावीला पोरीने ९६ टक्के मिळवले तर पुढे बारावीला तशाच अभ्यास ठेवून ९७ टक्के मिळवले. त्यांनतर पुढच्या शिक्षणासाठी मुद्रा महाराष्ट्रात आली, येथे तिने डेंटल मध्ये गोल्ड मेडल मिळवले.
मुद्राला तिच्या वडिलांच्या स्वप्नाबाबत माहीत होते. त्यासाठी तिने डेंटलचा अभ्यास अर्ध्यातच सोडला. तिने UPSC ची तयारी सुरु केली. तिने एकदा नाही अनेकदा परीक्षा दिली. कधी मेन्समध्ये नापास तर कधी मुलाखतीतून बाहेर! पण तिने जिद्द सोडली नाही. अखेर 2021 मध्ये 165 रँकसह तिने UPSC पार केली. पण तिला IAS व्हायचे होते. त्यामुळे तिने पुन्हा प्रयत्न केले आणि 2022 मध्ये पुन्हा प्रयत्न करून IPS मुद्रा झाली IAS!
मुद्रांच्या वडिलांनी 1975 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती पण त्याकाळी त्यांनी Mens तर पार केली पण मुलाखतीतून ते बाहेर आले. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलाने ते अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे, जेणेकरून मुलांकडून का होईना पण त्यांना ती गोष्ट पूर्ण करण्याचा आनंद मिळेल. त्यामुळे मुद्राने अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. वाटेत अनेक गोष्टी आल्या, पण त्यांना बाजूला सारून, पुन्हा उभे राहून वडिलांचे स्वप्न साकार केले.






