Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…

ISRO: अंतराळ संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोने इंटर्नशिपची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना अनुभवी शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची आणि संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळेतील कामकाज तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 24, 2026 | 01:54 PM
ISRO Internship (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

ISRO Internship (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

ISRO Internship 2026 News: ISRO हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे मोठं अंतराळ किंवा अंतरावीर. प्रत्येक विज्ञान क्षेत्रातील काम करणाऱ्या विद्यार्थ्याचे स्वप्न असते की, आपण अवकाश संशोधनात काम करावे. आता तेच स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी इस्रो एक मोठी संधी घेऊन येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने आता विद्यार्थ्यासाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवी शास्त्रज्ञांसोबत काम करता येणार आहे.

देशातील अनेक विद्यार्थी इस्रोमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, त्या वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी फार कमी जणांना मिळते. ही इंटर्नशिप अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळेतील कामकाज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जवळून अभ्यास करता येईल. या इंटर्नशिपला केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

पात्रता काय जाणून घेऊया..

  • विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेत पदवी
  • पदव्युत्तर शिक्षण किंवा संशोधन करणारे विद्यार्थी
  • नुकतीच पदवी मिळालेले विद्यार्थी
  • शैक्षणिक गुणवत्तेला विशेष महत्त्व
  • अर्जदारांनी आवश्यक किमान गुण
विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) इंटर्नशिपसाठी अभियांत्रिकी, विज्ञान तसेच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र, संबंधित अभ्यासक्रमातील ठरावीक सत्र पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या संधीचा लाभ मिळणार आहे.

JOB News: IT क्षेत्रातील तरुणांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी देणार 20,000 नव्या नोकऱ्या; जुन्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची तारीखही ठरली

इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा आठवड्यांदरम्यान असेल. या काळात विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल. संशोधन पद्धती, तांत्रिक विश्लेषण आणि वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रशिक्षणातून मिळणार आहे. मात्र, हा केवळ शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रम असल्यामुळे कोणतेही मानधन, स्टायपेंड, राहण्याची किंवा जेवणाची सुविधा दिली जाणार नाही.

निवड प्रक्रिया कशी असेल..

निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आणि संबंधित केंद्रातील उपलब्ध जागांवर आधारित असेल. तसेच प्रयोगशाळांची क्षमता आणि मार्गदर्शकांची उपलब्धता लक्षात घेऊन अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती पाठवली जाईल. एका विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण पदवी शिक्षणादरम्यान फक्त एकदाच या इंटर्नशिपमध्ये सहभागी होता येणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम तारीख

बीएससी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे.

अर्ज करताना कोणते कागदपत्रे असावी..

गुणपत्रिका
महाविद्यालयाचे परवानगीपत्र
प्रकल्पांचा तपशील
तांत्रिक कौशल्ये
इतर आवश्यक कागदपत्रे एकाच पीडीएफ(PDF) स्वरूपात अपलोड करावी लागतील.

कोण-कोणत्या केंद्रावर अर्ज करु शकतात?

बंगळुरूतील यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर
अहमदाबादमधील स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर
तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर
श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटर
डेहराडूनमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग

IIT Teacher Shortage: देशातील २३ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापकांची पदे रिक्त? पण पीएचडी होऊनही पदे का भरली जात नाहीत?

अवकाश विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान किंवा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप एक महत्त्वाची पायरी ठरू शकते. पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव मिळाल्यास भविष्यातील करिअरसाठी मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या संधीचा नक्की लाभ घ्यावा.

Web Title: A golden opportunity for an internship at isro get a to z information on required documents the application deadline and eligibility criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Government Job
  • ISRO Scientists
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!
1

SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
2

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
3

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
4

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.