Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक क्षण! ‘सिव्हिल’मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू; प्रवेश प्रक्रिया कधीपासून? जाणून घ्या

अहिल्यानगरमध्ये ‘सिव्हिल’ रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंद्याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2026 | 03:28 PM
'सिव्हिल'मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू; यंदापासूनच प्रवेश प्रक्रिया

'सिव्हिल'मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू; यंदापासूनच प्रवेश प्रक्रिया

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक क्षण
  • ‘सिव्हिल’मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
  • यंदापासूनच प्रवेश प्रक्रिया
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अखेर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ याच शैक्षणिक वर्षापासून (२०२६) सुरू होत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची वर्षभरातच अंमलबजावणी करत महायुती सरकारने जिल्ह्याला मोठी आरोग्य भेट दिली आहे.

Maharashtra Board Result Date : दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली? मात्र गुणपत्रिकेत होणार मोठे बदल!

मंत्रिमंडळाच्या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी

६ मे २०२५ रोजी अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत जिल्ह्यासाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून, सोमवारी २७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महाविद्यालय यंदापासूनच कार्यान्वित होत असल्याचे जाहीर केले.

शंभर जागा आणि अत्याधुनिक सुविधा

या नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.

महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

विद्यार्थी क्षमता: दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची (MBBS) संधी मिळणार आहे.

रुग्णालय क्षमता: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ४३० खाटांची क्षमता असलेले सुसज्ज रुग्णालय या कॉलेजला जोडलेले असेल.

प्रवेश प्रक्रिया: शैक्षणिक वर्ष २०२६ पासूनच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

जिल्ह्यातील आरोग्य सेवेला मिळणार गती

अहिल्यानगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज होती. आता सिव्हिल हॉस्पिटलचे रूपांतर मेडिकल कॉलेजमध्ये झाल्यामुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून, जिल्ह्यातील सामान्य रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार स्थानिक पातळीवरच मोफत उपलब्ध होतील. राज्यातील महायुती सरकारने दिलेल्या शब्दाला जागत वर्षभरातच हे महाविद्यालय सुरू केल्याने जिल्हाभरातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

Web Title: A historic moment for ahilyanagar government medical college starts in civil admission process begins this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Career News

संबंधित बातम्या

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
1

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा
2

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
3

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक
4

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.