Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher Training : जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार

शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 11:28 AM
जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार

जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार

Follow Us
Follow Us:

पुणे : शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, १० जुलैपर्यंत तालुका स्तरापर्यंतचे पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षण वेळापत्रकासह सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले.

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले झाले आहे. तर सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. जनगणना २०२७ च्या कामांमध्ये शिक्षकांचा सहभाग असल्याने प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करूनही ते पुढे ढकलावे लागले होते.

वेळापत्रकानुसार, सहावीच्या शिक्षकांसाठी १७ आणि १८ जून रोजी पूर्वतयारी कार्यशाळाही घेतली जाणार आहे. त्यानंतर चार दिवसांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण २२ ते २५ जून या कालावधीत होणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण २९ जून ते २ जुलै, तर तालुकास्तरीय प्रशिक्षण ४ ते १० जुलैदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता दुसरीचे तीन दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० जून, तीन दिवसांचे तालुकास्तर प्रशिक्षण २२ जून ते २ जुलै या कालावधीत होणार आहे. इयत्ता तिसरी आणि चौथी या इयत्तांच्या शिक्षकांसाठी १८ ते ३० जून या कालावधीत चार दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण, तर २४ जून ते ४ जुलै या कालावधीत तीन दिवसांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रत्येकी ६० शिक्षकांच्या गटानुसार प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या तुकड्या तयार करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक टप्प्यांत प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या, तसेच जनगणना, मतदार नोंदणी यांसारख्या राष्ट्रीय कामकाजात शिक्षकांची नियुक्ती असल्यास त्यानुसार प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग

इयत्ता सहावीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी मराठी माध्यमातील २४४ आणि उर्दू माध्यमातील २४० प्रशिक्षक अपेक्षित आहेत. संबंधितांचा तपशील १५ जूनपर्यंत सादर करावा. प्रत्येक वर्गाच्या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यात कार्यरत विशेष शिक्षक, साधन व्यक्ती यांचाही समावेश करावा. त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यांनी अनुभवी शिक्षक, व्याख्याते, पर्यवेक्षकीय अधिकारी आणि अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजन होते. प्रशिक्षण वेळापत्रकानुसार आयोजित करण्यासाठी पूर्ण प्रयत्नही करण्यात आले. मात्र, जनगणनेच्या कामामुळे प्रशिक्षण पुढे ढकलावे लागले. आता १० जुलैपर्यंत चार इयत्तांचे तालुकास्तरापर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. – डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद.

Web Title: A new schedule has been announced for the teacher training that had been stalled due to the census

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • maharashtra
  • Teacher
  • Teachers

संबंधित बातम्या

कारवाई करा, अन्यथा २ ऑक्टोबरला आत्मदहन, अक्कलकोटच्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीवरून शिक्षक संघटना आक्रमक
1

कारवाई करा, अन्यथा २ ऑक्टोबरला आत्मदहन, अक्कलकोटच्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीवरून शिक्षक संघटना आक्रमक

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
2

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
3

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
4

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.