Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

NCMC Card Registration: एसटीने महिला प्रवाशांसह सर्व सवलतधारकांना NCMC कार्डची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. नोव्हेंबरअखेर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना सुविधा मिळावी यासाठी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2026 | 12:47 PM
महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा...; एसटी महामंडळाचे निर्देश

महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा...; एसटी महामंडळाचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • NCMC कार्ड नोंदणीसाठी एसटी महामंडळाची लगबग
  • नोव्हेंबरअखेर मुदत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
  • एसटी महामंडळाचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलत धारक प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी राष्ट्रीय सामान्य वाहतूक कार्ड (NCMC) नोंदणीला गती देण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. विशेषतः महिला प्रवाशांनी नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (NCMC Card Registration)

सरकारच्या निर्णयानुसार एसटी महामंडळातील सर्व सवलतधारक प्रवाशांना प्रवासभाड्यातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी एसटी आगार, बसस्थानके तसेच प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी अधिकृत एजन्सीच्या माध्यमातून कार्ड नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिकृत केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते.

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी

नोव्हेंबरअखेर कार्ड नोंदणी पूर्ण

महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी नोव्हेंबरअखेर कार्ड नोंदणी पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून विशेष नोंदणी व वितरण शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरांच्या आयोजनासाठी संबंधित कार्यालयांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाशी किंवा आगार प्रतिनिधींशी संपर्क साधावा. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गृहिणी तसेच नोकरदार महिलांसह सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी महत्त्वाची

एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ पात्र प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, तसेच संबंधित यंत्रणांनी अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

NCMC कार्ड कसे काढायचे?

NCMC नोंदणी केंद्र किंवा अधिकृत एजंटकडे चौकशी करा. आधार कार्ड आणि आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक जवळ ठेवा. आवश्यकतेनुसार संबंधित सवलतीचा पुरावा द्या. उपलब्ध माहितीनुसार नवीन कार्डसाठी शुल्क ₹१९९ आहे. जुन्या एसटी स्मार्ट कार्डच्या बदल्यात कार्ड घेताना वेगळे शुल्क लागू असू शकते. कार्ड मिळाल्यानंतर ते सक्रिय करा आणि प्रवासासाठी आवश्यक शिल्लक रक्कम भरा.

NCMC कार्ड रिचार्ज कसे करायचे?

– BHIM ॲप: कार्डच्या मागील बाजूचा QR कोड स्कॅन करून टॉप-अप करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
– एसटी आगार किंवा अधिकृत केंद्र: उपलब्ध सुविधेनुसार कार्ड रिचार्ज करता येते.
– प्रवासापूर्वी: कार्ड सक्रिय आहे आणि आवश्यक शिल्लक उपलब्ध आहे, याची खात्री करा. रिचार्ज केल्यानंतर काही प्रकरणांत शिल्लक कार्डवर अद्ययावत करून घ्यावी लागू शकते.

कार्ड मिळाले नसेल तर काय करावे?

नोंदणी पूर्ण झाली आहे, पण प्रत्यक्ष कार्ड अद्याप मिळालेले नाही, तर QR कोड असलेली नोंदणी पावती काही कालावधीसाठी सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी वापरता येते. प्रसिद्ध माहितीनुसार, ही पावती ३० दिवस वैध असते आणि वाहकाच्या ETM मशीनवर QR कोड स्कॅन केला जातो. प्रवासापूर्वी आपल्या आगारात या सुविधेची खात्री करा.

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

💡

Frequently Asked Questions

  • Que: NCMC कार्ड नोंदणीचे आवाहन कोणासाठी करण्यात आले आहे?

    Ans: महिला प्रवाशांसह एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र प्रवाशांना NCMC कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Que: NCMC कार्ड नोंदणी कधीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे?

    Ans: एसटी महामंडळाने नोव्हेंबरअखेर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

  • Que: ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळ काय करणार आहे?

    Ans: ग्रामीण भागातील प्रवाशांना NCMC कार्डची नोंदणी करणे सोपे व्हावे, यासाठी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Web Title: Msrtc appeals women passengers concession beneficiaries to register for ncmc card sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • NCMC Card
  • st bus

संबंधित बातम्या

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा
1

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा

Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
2

Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Accident News: आंबी एमआयडीसीत डंपरचा मृत्यूचा खेळ! अपघातात ५६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
3

Accident News: आंबी एमआयडीसीत डंपरचा मृत्यूचा खेळ! अपघातात ५६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सचिवांच्या कामकाजावरून वाद; भाजप नगरसेवकांनीही उपस्थित केले प्रश्न
4

Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सचिवांच्या कामकाजावरून वाद; भाजप नगरसेवकांनीही उपस्थित केले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.