
२१० शिपाई, ५२ चालक तर कारागृह दलात ११८ शिपाई , राज्यात 380 जागांवर पोलीस भरती
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घटकनिहाय मैदानी चाचण्यांना सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण करुन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊ शकते. दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेचे निवडणूक जाहिर झाली नसली तरी इतर ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांचा काही परिणाम होणार का याची चिंता भरतीसाठी मैदानात उत्तरणाऱ्या उमेदवारांना सतावते आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली आहे.
कारागृह, एसआरपीएफ शिपाई संवर्गाला सर्वाधिक पसंती देण्यात येणार आहे. या भरतीसाठी मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज आले असून, कारागृह, एसआरपीएफ शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती असल्याचे दिसते. प्राप्त अर्जाची छाननी होणार असून, मैदानी चाचणीवेळी कागदपत्रे तपासणी बारावी उत्तीणांसह पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, इंजिनीअर, आयटी क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत. सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षेचे नियोजन असून, शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा होईल.
नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक तर कारागृह दत्लात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे. २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी असल्याने राज्यभरात सर्वत्र अजर्जाची संख्या वाढली आहे. सिंहस्थासाठी ग्रामीण पोलिसांना मिळणार बळ नाशिक शहरात पदे रिक्त नसल्याने तेथील भरती घोषित झालेली नाही.
ग्रामीण पोलिस दलात होणऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचारी ग्रामीण पोलिसांसाठी उपलब्ध असतील. २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत दीडशे, तर २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली होती. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे.