सीईटी परीक्षा २०२६ मध्ये ६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
आजपर्यंत सीईटीच्या सर्व अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू असून ६ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जे विद्यार्थी यावर्षी सीईटी परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी त्या सीईटी परीक्षेची अंतिम तारीख संपण्यापूर्वी नोंदणी करावी असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे. मागील वर्षी राज्यातून १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आजपर्यंत एकूण ६ लाख ४ हजार ८३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेला नोंदणी केली तर प्रथमच विद्यार्थ्यांना तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला दोन संधी देण्यात आली आहे. यानुसार दोन संधी मिळून ही नोंदणी ८ लाख ४५ हजार ७०८ अशी झाली आहे.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”
या मिळालेल्या दोन संधीमुळे पीसीएम, पीसीबी आणि एमबीए / एमएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या प्रवेश परीक्षेला ४ लाख ५ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर २ लाख ४० हजार ८६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेच्या दोन संधीला पसंती दिली. आजपर्यंतप्रवेश परीक्षेसाठी सर्वात जास्त नोंदणी पीसीएमसीईटीसाठी झाली असून २ लाख ४१ हजार १३५ विद्यार्थ्यांनी प्रथम संधीसाठी नोंदणी केली आहे तर दोन संधीसाठी १ लाख ६८ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पीसीबी सीईटीसाठी प्रथम संधीसाठी १ लाख २६ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असूनदोन संधीसाठी ५५ हाजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
प्रवेशपरीक्षेच्या दोन संधी
राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या(मेन) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून यावर्षा पासून एमएच सीईटी पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय उच्च व तंत्राशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादापाटील यांनी घेतला. यानुसार पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल.
हे देखील वाचा : ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य
CET नोंदणी विद्यार्थ्यांची संख्या






