Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ADB Japan Scholarship 2026: भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! विदेशात शिक्षणासाठी मिळणार लाखोंची शिष्यवृत्ती, जाणून घ्या सविस्तर

जपानमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ADB Japan Scholarship 2026 अंतर्गत विद्यार्थ्यांना टॉप विद्यापीठांमध्ये मास्टर्स शिक्षणासोबत ट्यूशन फी, राहणीमान आणि प्रवास खर्चासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 03:21 PM
ADB Japan Scholarship 2026: भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! विदेशात शिक्षणासाठी मिळणार लाखोंची शिष्यवृत्ती, जाणून घ्या सविस्तर

ADB Japan Scholarship 2026: भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! विदेशात शिक्षणासाठी मिळणार लाखोंची शिष्यवृत्ती, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • एडीबी जपान स्कॉलरशिप 2026 अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये मास्टर्स शिक्षणाची संधी मिळणार आहे.
  • शिष्यवृत्तीमध्ये ट्यूशन फी, निवास, भोजन, वैद्यकीय विमा आणि प्रवास खर्चाचा समावेश आहे.
  • अर्जदाराकडे चांगला शैक्षणिक रेकॉर्ड, किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आणि इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि यासाठी तुम्हाला लाखो रुपयांची शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे. ADB Japan Scholarship 2026 अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील टॉप यूनिवर्सिटीजमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या स्कॉलरशिपबाबतची विशेष गोष्ट म्हणजेच यामध्ये अभ्यासापासून राहण्याचा आणि प्रवासाच्या बहुतांश खर्चांचा समावेश होतो.

परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर आजच ‘या’ शैक्षणिक स्थळांचा यादीमध्ये करा समावेश, करिअरला मिळेल नवीन दिशा

एडीबी जपान स्कॉलरशिप प्रोग्राम

एडीबी जपान स्कॉलरशिप प्रोग्रामची सुरुवात जपान सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँकद्वारे करण्यात आली होती. या स्कॉलरशिपचा उद्देश विकसनशील देशांमधील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगले पर्याय उपलब्ध करून देणे असा आहे. या एडीबी जपान स्कॉलरशिपअंतर्गत विद्यार्थी इकोनॉमिक्स, मॅनेजमेंट, साइंस, टेक्नोलॉजी आणि डेवलपमेंटसंबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्कॉलरशिपअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार या सुविधा

या स्कॉलरशिपअंतर्गत विद्यार्थ्यांची संपूर्ण ट्यूशन फी माफ केली जाते. याशिवाय, निवास आणि भोजनासाठी मासिक भत्ता देखील दिला जातो. पुस्तक आणि अभ्यासासंबंधित साहित्यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. तसेच यामध्ये वैद्यकीय विमा आणि येण्या-जाण्याचा प्रवासाचा खर्च देखील मिळतो. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रबंध तयार करण्यासाठी अतिरिक्त अनुदान देखील मिळू शकते. एडीबी जपान स्कॉलरशिप सहसा एका वर्षासाठी उपलब्ध असते. जर विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती चांगली असेल तर एडीबी जपान स्कॉलरशिप दुसऱ्या वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते. उच्च शिक्षणासाठी याचा कालावधी जास्तीत जास्त दोन वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी या अटी पूर्ण करणं गरजेचं

या स्कॉलरशिपसाठी अर्ज करणारा उमेदवार एडीबी सदस्य देशाचा नागरिक असणं गरजेचं आहे. अर्जदाराला जपानमधील पात्र विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणं गरजेचं आहे. ग्रॅज्यूएशनमध्ये चांगली शैक्षणिक कामगिरी असणं गरजेचं आहे. तसेच कमीत कमी दोन वर्षांचा कामाचा अनुभव असला पाहिजे. इंग्रजी भाषेचे ज्ञान असले पाहिजे आणि सहसा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांहून कमी असले पाहिजे.

या विद्यापिठांत शिक्षण घेण्याची संधी

एडीबी जपान स्कॉलरशिपअंतर्गत विद्यार्थ्यांना जपानमधील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. यामध्ये टोकियो विद्यापीठ, क्योटो विद्यापीठ, तोहोकू विद्यापीठ, क्यूशू विद्यापीठ, नागोया विद्यापीठ, केइओ विद्यापीठ, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जपान आणि त्सुकुबा विद्यापीठ यांसारख्या 17 इतर विद्यापीठांचा समावेश आहे.

BMC Education: पालिका शिक्षण विभागाचा नवा उपक्रम; शैक्षणिक वर्षात सायन्स सोमवार अभ्यासक्रमात दाखल!

अशी पार पडते निवड प्रक्रिया

अर्जदाराला सर्वात आधी एका विद्यापीठाची निवड करावी लागणार आहे आणि तिथे प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना एडीबी-जेएसपी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा पर्यायही निवडणे आवश्यक आहे. यानंतर विद्यापीठ पात्र अर्जदारांची यादी तयार करते आणि एडीबीला पाठवते. अंतिम निवड एडीबीद्वारे केली जाते आणि निवड झालेल्या उमेदवारांना विद्यापीठाकडून सूचित केले जाते.

Web Title: Adb japan scholarship 2026 indian students can study in japan with full financial support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • education
  • Japan
  • study

संबंधित बातम्या

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड
1

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड

PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करायचे स्वप्न पाहताय? मग लगेच जाणून घ्या तेथील खर्च, फी आणि स्कॉलरशिपबद्दल..
2

PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करायचे स्वप्न पाहताय? मग लगेच जाणून घ्या तेथील खर्च, फी आणि स्कॉलरशिपबद्दल..

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..
3

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
4

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.