परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर आजच 'या' शैक्षणिक स्थळांचा यादीमध्ये करा समावेश, करिअरला मिळेल नवीन दिशा
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, असे कायमच म्हंटले जाते. कितीही पुस्तके वाचली किंवा कादंबऱ्या वाचल्या तरी त्या कमीच पडतात. १० वी किंवा १२ वी झाल्यानंतर प्रत्येकाला कायमच असेच वाटत असेल की पुढील शिक्षणासाठी परदेशात जावे. त्यामुळे प्रत्येक वर्षी भारतातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांची निवड करतात. परदेशात दिले जाणारे शिक्षण भारतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. परदेशात शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना केवळ उच्च दर्जाचे शिक्षण मिळत नाही तर इतर देशांमधील संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची संधीसुद्धा मिळते. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिग्री किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात परदेशात जाऊन शिक्षण घेताना कोणते विद्यापीठ निवडावे? कोणत्या विषयांची निवड करावी? असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर जगातील या शिक्षण स्थळांमध्ये नक्कीच प्रवेश घ्या. यामुळे तुमच्या करियरला एक नवीन दिशा मिळून तुमची स्वप्न साकार होतील.
नवीन अभ्यासक्रमासाठी ‘सेतू’ची अमलबजावणी; राष्ट्रीय धोरणानुसार होणार टप्प्याटप्प्याने सुरुवात
परदेशात जाऊन उच्च शिक्षणाचा विचार करत असाल तर सगळ्याच्या मनात आधी अमेरिकेचे नाव येते. याचे प्रमुख कारण म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या प्रतिष्ठित संस्था. परदेशात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेली मुलं या संस्थांमध्ये जाऊन शिक्षण घेतात. या अमेरिकन विद्यापीठांनी दरवर्षी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या यादीमध्ये सुद्धा आपले प्रमुख स्थान मिळवले आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा परदेशात जाऊन शिक्षण घ्याचे असल्यास अमेरिका उत्तम पर्याय आहे.
ऑस्ट्रेलिया हे परदेशात शिक्षण घेण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण मानले जाते. दरवर्षी शेकडो भारतीय विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळवणे अतिशय सोपे आहे. तिथे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये तसेच वाणिज्य आणि कला शाखांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेऊ शकतात. सिडनी विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठ ही ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्तम विद्यापीठ आहेत.
शिक्षणासाठी अतिशय उत्तम मानले जाणारे ठिकाण म्हणजे जर्मनी. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल जर्मनीच्या यादीचा सुद्धा लिस्टमध्ये समावेश करावा. जर्मनीमधील राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च इतर देशांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. जर्मनीमध्ये अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, डेटा सायन्स आणि STEM क्षेत्रांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी यूके सगळ्यात महत्वाचे मानले जाते. केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स ही यूकेमधील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी मानली जातात.तिथे तुम्ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबतच, यूकेमधील पदवी अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण करू शकता. भारतीय विद्यार्थी प्रामुख्याने शिक्षणासाठी यूके मध्ये जातात.परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर आजच ‘या’ शैक्षणिक स्थळांचा यादीमध्ये करा समावेश, करिअरला मिळेल नवीन दिशा






