JNV(फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
जवाहर नवोदय विद्यालय (JNV) ने इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही अर्ज प्रक्रिया इयत्ता 6 वी च्या 2026 च्या बॅचमध्ये प्रवेशासाठी केली जात आहे. जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घ्यायचे असेल. तर आजच तुम्ही यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करा. चला जाणून घेऊया अर्ज कसा करायचा आणि अर्ज करायची शेवटची तारीख काय?
जर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अनेक पात्रता निकष आहेत, जे पूर्ण करणे अनिवार्य आहे.
JNVST 2026 Prospectus Direct link
पात्रता-
१. विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळेल. प्रवेश अर्ज भरण्यासाठी, विद्यार्थ्यांना निवास प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल.
२. जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ६ मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, विद्यार्थ्याने कोणत्याही सरकारी शाळेतून किंवा सरकारी अनुदानित शाळेतून किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ३, ४ आणि ५ वी शिकलेली आणि उत्तीर्ण असावी.
३. विद्यार्थ्याला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देण्याची फक्त एकच संधी मिळेल.
४. जवाहर नवोदय विद्यालयातील ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील मुलांसाठी राखीव आहेत. उर्वरित २५ टक्के जागांवर गुणवत्तेच्या आधारे शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश दिला जाईल.
५. ग्रामीण कोट्यात प्रवेश मिळविण्यासाठी, विद्यार्थ्याने कोणत्याही सरकारी शाळेतून किंवा सरकारी अनुदानित शाळेतून किंवा त्याच्या ग्रामीण जिल्ह्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ३, ४ आणि ५ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
६. कोणत्याही शहरी सरकारी शाळेतून किंवा सरकारी अनुदानित शाळेतून किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ३, ४ आणि ५ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील मानले जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ जुलै २०२५
अर्ज करण्यासाठी संकेत स्थळ:
navodaya.gov.in
cbseitms.nic.in
JNVST इयत्ता 6 वी प्रवेश 2026: अर्ज कसा करायचा
1. नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in ला भेट द्या.
2. Click here for Class VI Registration 2025 या लिंकवर क्लिक करा
3. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल.
4. अर्ज फॉर्म भरा आणि अर्ज शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
5. लक्षात ठेवा की अर्ज करताना, खालील कागदपत्रांचे JPG स्वरूपात 10 kb ते 100 kb आकाराचे फोटो अपलोड करावे लागतील.
6. फोटो, पालकांची स्वाक्षरी, विद्यार्थ्याची स्वाक्षरी, आधार कार्ड तपशील. लक्षात ठेवा की प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या तपशीलांसह मुख्याध्यापकांनी पडताळले पाहिजे.
नोट : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) च्या आधारे केला जाईल.