फोटो सौजन्य - Social media
अंजली बिर्ला यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे कोर्टाची धाव घेतली आहे. अंजली बिर्ला IRPS अधिकारी आहेत. विशेष म्हणजे त्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या असल्याने त्यांना या सगळ्या आरोपांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून अंजली यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केले जात आहेत कि वडिलांच्या प्रेशरमुळे अंजलीने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली आहे. अंजलीने या सगळ्या आरोपांना फेटाळून ते खोटे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाविषयी अंजलीने दिल्ली हाई कोर्टात धाव घेतली आहे.
IRPS अधिकारी अंजली बिर्ला यांचे म्हणणे आहे कि सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. हे प्रकरण त्यांच्यासाठी अपमानजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे देखील म्हणणे आहे कि हे आरोप त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवण्यासाठी मुद्दामून केले जात आहे. कदाचित असे वातावरण निर्मण करून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वाद निर्माण करण्याचा हा डाव असावा, असे मत अंजली बिर्ला यांनी व्यक्त केले आहे. या पोस्ट विरोधात अंजली यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे.
न्यायमूर्ती नवीन चावला यांनी सदर सोशल मीडिया पोस्टला पुढे पसरवण्यावर बंदी घातली आहे. तसेच या प्रकरणावर लवकरच सुनावणी करण्यात येईल असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या २४ तासात पोस्ट हटवले जाण्याचे आश्वासन कोर्टकडून देण्यात आली आहे. जर अंजली यांना त्यांच्या संबंधित आणखीन पोस्ट आढळून आल्या तर त्यांनी सरळ गूगलकडे तक्रार करण्याचे निर्देश कोर्टाकडून आले आहेत. तर या प्रकरणासंबंधित दिल्ली हायकोर्टाने गूगल, एक्स आणि अन्य यंत्रणांना नोटीस जारी केली आहे.