
Dinvishesh
Sushma Swaraj Death Anniversary: आज भारताच्या एक दिग्गज राजकारणी, उत्कृष्ट वक्ता आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी आहे. आपल्या कणखर नेतृत्वगुणांमुळे आणि प्रभावी भाषणशैलीमुळे त्यांनी भारतीय राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना ‘देशाच्या सर्वोत्तम परराष्ट्र मंत्र्यांपैकी एक’ म्हणून ओळखले जाते.