Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला

'आकारांची गंमत भारी' या घटकात हाताची बोटे, झाडांच्या फांद्या, योगासने तसेच दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तयार होणाऱ्या कोनांच्या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना भूमितीची ओळख करून देण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 09:10 PM
खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी;  बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला
Follow Us
Follow Us:

चौथीचे नवे गणित पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला
खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी
गणितातील संकल्पना पाठांतराऐवजी अनुभवातून समजावून देण्यावर भर 

सोनाजी गाढवे/ पुणे:  बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता चौथीसाठी तयार करण्यात आलेले गणित विषयाचे नवीन पाठ्यपुस्तक अधिक आकर्षक, कृतीप्रधान आणि विद्यार्थीकेंद्रित स्वरूपात तयार करण्यात आले आहे. दैनंदिन (Career) जीवनातील उदाहरणे, चित्रे, संवाद, खेळ, उपक्रम आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. गणितातील संकल्पना पाठांतराऐवजी अनुभवातून समजावून देण्यावर पुस्तकात विशेष भर देण्यात आला आहे.

या पुस्तकात संख्यांशी खेळू या, आकारांची गंमत भारी, बेरीज व वजाबाकी, अपूर्णांक, लांबी व वजन, माहितीचे व्यवस्थापन, नजरी नकाशा, गुणाकार, भागाकार, सममिती, परिमिती व क्षेत्रफळ, आकारमान व धारकता, कालमापन आणि आकृतीबंध असे एकूण १४ घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.

‘संख्यांशी खेळू या’ पहिल्या घटकात हजारची ओळख क्रिकेट बॅटच्या किंमतीच्या उदाहरणातून करून देण्यात आली आहे. एक हजार ही संख्या विविध प्रकारे कशी तयार होते, चार अंकी संख्यांचे वाचन-लेखन, विस्तारित रूप, स्थानिक किंमत, चढता-उतरता क्रम तसेच मोठी-लहान संख्या यांसारख्या संकल्पना संवाद आणि कृतींच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या आहेत. सम आणि विषम संख्यांची ओळख फुलांचे गट तयार करण्याच्या उपक्रमातून करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा

‘आकारांची गंमत भारी’ या घटकात हाताची बोटे, झाडांच्या फांद्या, योगासने तसेच दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तयार होणाऱ्या कोनांच्या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना भूमितीची ओळख करून देण्यात आली आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या संकल्पना दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणे आणि संवादाच्या माध्यमातून शिकविण्यात आल्या आहेत. अपूर्णांक शिकविताना टॅनग्रामसारख्या कृतींचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांना आकृत्या कापून विविध आकार तयार करण्याची संधी देण्यात आली आहे.

लांबी, वजन, क्षेत्रफळ आणि धारकता यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष मोजमापाच्या उपक्रमांतून शिकविण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळेच्या परिसरातील वस्तूंची लांबी मोजण्यासाठी योग्य एककांची निवड, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर आणि किलोग्रॅम यांचा वापर विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला आहे. माहितीचे व्यवस्थापन, चित्रतक्ते, नजरी नकाशा, सममिती आणि आकृतीबंध या घटकांमधून निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि विश्लेषण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

CBSE 10वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; कुठे आणि कसा चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारतीय मीराबाई चानू आणि महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहितीही पुस्तकात देण्यात आली आहे. त्यामुळे गणित हा केवळ आकडेमोडीचा विषय न राहता आनंद, प्रयोग, निरीक्षण आणि विचारांची जोड देणारा विषय ठरावा, या उद्देशाने बालभारतीने चौथीचे नवीन गणित पुस्तक अधिक आधुनिक, रंजक आणि उपक्रमाधारित स्वरूपात साकारले आहे.

Web Title: Balbharatis new class 4 mathematics textbook released for students carrer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • balbharati
  • Career News
  • Schools

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
4

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.