Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनात जिद्द असेल तर काय कँसर नि काय आजारपण… आयुष्याशी झुंज देत पट्ठ्याने दहावी केली उत्तीर्ण

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत चिरंतन होन्नापुरा याने दहावीत ९२% गुण मिळवले. आता तो IPS अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुढे वाटचाल करत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2025 | 06:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कधी कधी काही व्यक्तींचा संघर्ष इतका मोठा असतो की तो इतरांसाठी प्रेरणादायक ठरतो. अशाच एका खंबीर विद्यार्थ्याची गोष्ट सध्या चर्चेत आहे. बेंगळुरूतील चिरंतन होन्नापुरा या मुलाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी सामना करत ICSE बोर्डाच्या दहावी परीक्षेत तब्बल ९२ टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या जिद्दीचा आणि मेहनतीचा सर्वत्र गौरव होत आहे.

‘अपयश ही यशाची पहिली पायरी!’ पहिल्या प्रयत्नात अपात्र, दुसऱ्या प्रयत्नात देशात पहिल्या Rankने झाला उत्तीर्ण

चिरंतन आर्यन प्रेसीडेंसी स्कूल, नागरभावी येथील विद्यार्थी आहे. नववीत असताना त्याला हाय-ग्रेड ऑस्टिओसारकोमा या हाडांच्या कॅन्सरचे निदान झाले. हा कॅन्सर विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये आढळतो आणि उपचारही अत्यंत कठीण असतात. ऑक्टोबरमध्ये आजार समोर आल्यानंतर त्याच्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली. हातातून हाड काढून टाकण्यात आलं. यामुळे काही काळ त्याला शाळाही सोडावी लागली. मात्र या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही चिरंतनने हार मानली नाही.

नववीच्या परीक्षेसाठी त्याने सहायक लेखकाच्या मदतीने परीक्षा दिली आणि ८२ टक्के गुण मिळवले. दहावीतही त्याने कोणतीही ट्युशन लावली नाही. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, ऑनलाइन क्लासेस आणि स्वतःचा आत्मविश्वास यावर विश्वास ठेवत त्याने अभ्यास केला. तीन महिने कीमोथेरपीमुळे शाळेत जाता आलं नाही, पण त्याने सोशल मीडियावरून लेक्चर्स ऐकले आणि अभ्यासात खंड पडू दिला नाही.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस भरती; इच्छुक उमेदवारांनी त्वरित करा अर्ज

चिरंतन सांगतो, “मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या शाळेची आणि मित्रांची खूप आठवण यायची. त्यांचाच आधार होता म्हणून मी या सगळ्या परिस्थितीतून बाहेर आलो.” तो पुढे म्हणतो, “मी क्लासमध्ये लक्ष देत असे, आणि जे शिकलो ते माझ्या भाषेत लिहून घेत असे. यामुळे समजायला आणि लक्षात ठेवायला सोपं गेलं.” सध्या चिरंतन कॉमर्स शाखेतून प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण घेत आहे. त्यानंतर तो कायद्याचं शिक्षण घेऊन UPSC परीक्षा देणार आहे. त्याचं स्वप्न आहे IPS अधिकारी बनण्याचं. “लहानपणापासून मला IPS व्हायचं होतं. मला समाजात काहीतरी चांगला बदल घडवायचा आहे,” असं तो ठामपणे सांगतो. चिरंतनसारख्या विद्यार्थ्यांकडून शिकण्यासारखं खूप आहे – संकट कितीही मोठं असो, मनात जिद्द असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते.

Web Title: Beat cancer scored 92 percent chirantan aims to become ips officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • cancer
  • IPS

संबंधित बातम्या

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!
1

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा
2

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC
3

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC

IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ
4

IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.