फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी SECR (दक्षिण पूर्व मध्य रेल्वे) नागपूर विभागात अप्रेंटिस भरतीची सुवर्णसंधी आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहे. एकूण १००७ रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे की खासकरून नागपूर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ९१९ पदे रिक्त आहेत तर मोतीबाग वर्कशॉपसाठी ८८ पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ४ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आता फक्त ३ दिवस शिल्लक आहेत.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तर उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी किमान १५ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त २४ वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गासाठी वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. SC/ST या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक 5 वर्षे सूट देण्यात येणार आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट तर दिव्यांग उमेदवारांना अधिक 10 वर्षे सूट देण्यात येणार आहे.
अर्ज फी सामान्य, OBC, आणि EWS प्रवर्गासाठी ₹100 निश्चित करण्यात आली आहे. तसेच SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना स्टायपेंड पुरवण्यात येणार आहे. 2 वर्षांचा ITI कोर्स केलेल्या उमेदवारांना ₹8050 प्रतिमाह स्टायपेंड देण्यात येणार आहे. तर 1 वर्षाचा ITI कोर्स करणाऱ्या उमेदवारांना ₹7700 प्रतिमाह स्टायपेंड देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
अधिकृत वेबसाइट: [http://secr.indianrailways.gov.in](http://secr.indianrailways.gov.in) किंवा [http://apprenticeshipindia.gov.in](http://apprenticeshipindia.gov.in)
अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.