
शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर... तज्ञांनी दिला अलर्ट
Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार, दरवर्षी १२ ते २८ टक्क्यांनी कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सांगितले जात आहे की, आताच्या काळात प्रत्येक ९ पैकी एक व्यक्ती कॅन्सरग्रस्त आढळतो. डाॅक्टरांच्या मते, शरीरात होणारे काही बदल हे कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे असून शकतात. दिर्घकाळ जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर कॅन्सरचा त्रास अधिक वाढू शकतो.
शाैच किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल
जर तुम्हाला दिर्घकाळापासून बद्धकोष्ठता, अतिसार, वारंवार लघवी होणे किंवा लघवी करण्याच्या सवयींमध्ये बदल जाणवत असेल तर ही फक्त आहाराची समस्या नाही. दिर्घकाळ शरीरात दिसून येणारी ही लक्षणे मूत्रमार्गाशी जोडलेल्या कर्करोगाचे संकेत असू शकतात.
जखम ठिक न होणे
त्वचेवर जखम, तोंडात अल्सर अशा समस्या जर बऱ्याच काळापासून ठिक होत नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे त्वचा किंवा तोंडाशी जोडलेल्या कर्करोगाचेही संकेत असू शकतात. वेळीच यावर डाॅक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
असामान्य रक्तस्त्राव
खोकताना रक्तस्त्राव होणे, शाैचातून रक्त निघणे किंवा महिलांमध्ये असामान्य रक्तस्त्राव होणे यांसारखी गंभीर लक्षणे धोक्याची ठरु शकतात. किरकोळ आजार समजून याकडे दुर्लक्ष करु नका, तर वेळीच अशी लक्षणे दिसताच रुग्णालय गाठा.
शरीरात गाठ किंवा सूज
ब्रेस्ट, टेस्टिकल्स, मान किंवा शरीराच्या कोणत्याही भगावर गाठ किंवा जाडसरपणा आढळत असल्यास लगेच यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सरची सुरुवातीची गाठ आधी त्रास देत नाही ज्यामुळे गाठ दुखत नसणे म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात असे होत नाही.
वारंवार खोकला
जर तुम्हाला अनेक आठवड्यांपासून वांरवार खोकल्याचा त्रास सतावत असेल तर वेळीच यावर उपचार घ्या. डाॅक्टरांच्या मते, दिर्घकाळ खोकल्याचा त्रास फुफ्फुसे घसा किंवा थायराॅडच्या कॅन्सरचे संकेत असू शकते. या संकेतांना वेळीच ओळखून जर तुम्ही रुग्णालय गाठले तर कॅन्सरसारख्या आजारापासून स्वत:चा जीव वाचवता येऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.