Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makeup Causes Cancer: मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Make up Products Causes Cancer: काही ब्युटी प्रोडक्ट्समध्ये हानिकारक रसायने असू शकतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या आणि हार्मोनल असंतुलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. दीर्घकाळ अशा प्रोडक्ट्सचा वापर केल्यास कर्करोगाचा संभाव्य धोका वाढू शकतो, त्यामुळे सुरक्षित घटक असलेले मेकअप प्रोडक्ट्स निवडणे महत्त्वाचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 26, 2026 | 08:35 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका?
  • ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
  • कोणती रसायने ठरू शकतात धोकादायक?
सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करणे ही आजच्या काळातील सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, त्वचेचे सौंदर्य वाढवणारी प्रत्येक ब्युटी प्रोडक्ट्स सुरक्षित असतातच असे नाही. काही मेकअप प्रोडक्ट्समध्ये आरोग्यासाठी घातक रसायने आढळू शकतात, ज्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास त्वचेच्या समस्या, हार्मोन्समध्ये बिघाड आणि काही प्रकरणांमध्ये कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे मेकअप खरेदी करताना केवळ ब्रँड किंवा किंमत न पाहता त्यातील घटकांची माहिती घेणे आणि सुरक्षित प्रोडक्ट्सची निवड करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. चला तर जाणून घेऊयात, कोणत्या मेकअप प्रोडक्ट्समुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

Curd Benefits: दह्यासोबत साखर की मीठ काय खावे? आरोग्यासाठी नेमकं काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या

कोणती रसायने ठरू शकतात धोकादायक?

काही मेकअप प्रोडक्ट्समध्ये फॉर्मल्डिहाइड, पॅराबेन्स, फ्थॅलेट्स, लीड (शिसे) यांसारखी रसायने आढळू शकतात. या घटकांचा शरीराशी सतत संपर्क आल्यास त्वचेची अॅलर्जी, जळजळ, हार्मोनल असंतुलन आणि दीर्घकाळात गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रोडक्ट्सवरील घटकांची यादी वाचणे आवश्यक आहे.

लिपस्टिक

निकृष्ट दर्जाच्या काही लिपस्टिकमध्ये शिसे किंवा इतर जड धातूंचे अंश असू शकतात. ही रसायने शरीरात हळूहळू जमा होतात. दीर्घकाळच्या वापरामुळे मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो.

फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट

फाउंडेशन त्वचेवर एका थराप्रमाणे काम करते, परंतु त्यात असलेले पॅराबिन्स, सिलिकॉन आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज त्वचेच्या पोअर्समार्फत शरीरात प्रवेश करू शकतात. दीर्घकाळ वापरल्यास हे घटक हार्मोन्सवर परिणाम करू शकतात.

मस्कारा आणि आयलाइनर

या प्रोडक्ट्सच्या सततच्या वापरामुळे रसायनांचे शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतात, ज्यांचा संबंध अनेक आरोग्य अहवालांमध्ये कर्करोगाच्या धोक्याशी जोडला गेला आहे.

नेल पॉलिश

नेलपॉलिशमध्ये अनेकदा टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड आणि डायब्युटिल फॅथलेट यांसारखी रसायने असतात. या तीन रसायनांचा दीर्घकाळ वापर केल्यास हार्मोनल असंतुलन, प्रजनन आरोग्याच्या समस्या आणि विषबाधा होऊ शकते. त्यामुळे दर्जेदार ब्रँडची प्रोडक्ट्स निवडणे अधिक सुरक्षित ठरते.

ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • नेहमी विश्वासार्ह आणि प्रमाणित ब्रँडची उत्पादनेच निवडा.
  • प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेट आणि घटकांची यादी तपासा.
  • कालबाह्य किंवा बनावट प्रोडक्ट्स वापरणे टाळा.
  • नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
  • त्वचेवर पुरळ, खाज किंवा जळजळ जाणवल्यास त्वरित वापर थांबवून त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मेकअप करणे चुकीचे नाही, मात्र सुरक्षित आणि दर्जेदार प्रोडक्ट्सची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सौंदर्य वाढवण्याबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी त्यातील घटक समजून घ्या, पॅच टेस्ट करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney Health: किडनी निरोगी ठेवायची आहे? रोजच्या जीवनात करा ‘या’ सोप्या सवयींचा अवलंब

Web Title: Harmful chemicals in makeup cancer risk beauty products safety tips cosmetics guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • cancer
  • Cancer Awareness
  • make up

संबंधित बातम्या

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार
1

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
2

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
4

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.