
Image
बेंजामिन नेतन्याहू यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण जेरुसलेममध्ये घेतले आणि हायस्कूलचे शिक्षण अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील ‘चेल्टेनहॅम हायस्कूल’मधून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (MIT) मध्ये प्रवेश घेतला. हे जगातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आहे. त्यांनी येथून आर्किटेक्चर (वास्तुकला) म्हणजेच इमारतींची रचना आणि बांधकामाशी संबंधित बॅचलर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एमआयटी (MIT) मधूनच मॅनेजमेंटमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. एमआयटीमध्ये शिकत असतानाच त्यांनी राज्यशास्त्राशी संबंधित विषयांचाही अभ्यास केला.
SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा
बेंजामिन नेतन्याहू यांनी एमआयटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्राचे उच्च दर्जाचे शिक्षण घेतले होते. त्यांनी या विषयात पीएच.डी.साठी संशोधन आणि कोर्सवर्कही पूर्ण केले होते, परंतु १९७६ मध्ये त्यांचे मोठे भाऊ जोनाथन यांच्या निधनानंतर ते शिक्षण सोडून इस्रायलला परतले. यामुळे त्यांची पीएच.डी. पूर्ण होऊ शकली नाही.
राजकारणात येण्यापूर्वी नेतन्याहू यांनी इस्रायली सैन्यात काम केले आहे. त्यांनी इस्रायली लष्कराच्या विशेष कमांडो युनिट ‘सायरेट मतकल’ (Sayeret Matkal) मध्ये सेवा बजावली होती. या दरम्यान त्यांनी अनेक लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला. लष्करातील कामाच्या अनुभवाने त्यांच्या आयुष्यावर आणि पुढील करिअरवर मोठा प्रभाव पाडला. लष्करातील सेवेनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम केले. त्यांनी अमेरिकेतील इस्रायलच्या मुत्सद्दी मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलचे राजदूत म्हणूनही कार्य केले.
बेंजामिन नेतन्याहू हे १९९६ मध्ये पहिल्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बनले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी पुन्हा हे पद भूषवले आणि प्रदीर्घ काळ सरकारचे नेतृत्व केले. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
Ans: त्यांनी अमेरिकेतील जगातील नामांकित मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून आर्किटेक्चर आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.
Ans: त्यांनी इस्रायली लष्कराच्या विशेष 'सायरेट मतकल' (Sayeret Matkal) या कमांडो युनिटमध्ये सेवा दिली तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) इस्रायलचे राजदूत म्हणून काम केले.
Ans: ते १९९६ मध्ये पहिल्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बनले आणि ते इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत.