Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karmala News : पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूने खळबळ; PSIसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित, CIDकडून तपास सुरू

Karmala News : करमाळा पोलीस कोठडीत स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा मोहिते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी PSI उघडे यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले असून सीआयडीमार्फत तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 28, 2026 | 09:35 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • २० ऑक्टोबरला झाली होती अटक
  • कोठडीच्या पहिल्याच दिवशी स्वतःला केले जखमी
  • PSI उघडे यांच्यासह दोघांवर निलंबनाची कारवाई
Karmala News : करमाळा पोलीस ठाण्याच्या कोठडीत असताना स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. बिटरगाव सांगवी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

२० ऑक्टोबरला झाली होती अटक

कृष्णा मोहिते यांच्याविरुद्ध त्यांच्या नातेवाईक असलेल्या महिलेने पोक्सो कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर २० ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

Maharashtra News : महाआयडी, महासारथी, महाडीबीटीचा विस्तार; सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणार – मुख्यमंत्री फडणवीस

कोठडीच्या पहिल्याच दिवशी स्वतःला केले जखमी

पोलीस कोठडीतील पहिल्याच दिवशी, म्हणजे २० ऑक्टोबर रोजी कृष्णा मोहिते यांनी भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना तातडीने करमाळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २३ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

BMC Employees Diwali Bonus : दिवाळीपूर्वी बंपर गिफ्ट! BMC कर्मचाऱ्यांना तब्बल 33000 रुपयांच्या बोनसची घोषणा; कधी जमा होणार पैसे?

PSI उघडे यांच्यासह दोघांवर निलंबनाची कारवाई

कोठडीतील आरोपीच्या मृत्यूची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. नातेवाईकांनीही मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तपासादरम्यान संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधित दिवशी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक उघडे, पोलीस कॉन्स्टेबल रणदील आणि कादगे यांना निलंबित करण्याची शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिघांच्या निलंबनाचे आदेश दिल्याचे समजते.

कृष्णा मोहिते यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती काय होती आणि या घटनेत कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे सीआयडीच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या कारवाईमुळे करमाळा परिसरासह पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Karmala police custody death psi two constables suspended cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Karmala
  • Marathi News
  • Solapur Police

संबंधित बातम्या

France News : उल्कापिंडांपासून बनवतो महागडे चाकू; एका चाकूची किंमत तब्बल ६.९ लाख रुपये; कारागिराची अनोखी कला चर्चेत
1

France News : उल्कापिंडांपासून बनवतो महागडे चाकू; एका चाकूची किंमत तब्बल ६.९ लाख रुपये; कारागिराची अनोखी कला चर्चेत

Saudi Arabia News : सौदीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवर
2

Saudi Arabia News : सौदीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवर

Maharashtra News : महाआयडी, महासारथी, महाडीबीटीचा विस्तार; सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणार – मुख्यमंत्री फडणवीस
3

Maharashtra News : महाआयडी, महासारथी, महाडीबीटीचा विस्तार; सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणार – मुख्यमंत्री फडणवीस

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
4

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.