Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या सुंदर प्रवासाची सुरुवात असून, कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने परीक्षा द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 07:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर आणि महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात असून, विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे. आगामी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा येत्या १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून, इयत्ता दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी सज्ज झाले असून, परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊ नये यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, त्यांचा प्रामाणिकपणा आणि कष्ट हीच त्यांची खरी ओळख आहे. परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि कायम लक्षात राहणारा टप्पा असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मेहनतीने या परीक्षांची तयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले असून, त्या कष्टांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसतात, तर त्यात आई-वडिलांची स्वप्ने, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत सामावलेली असते, असे सांगत मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शांत मन हेच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.

परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, पुरेशी झोप घ्यावी, सकस व संतुलित आहार घ्यावा आणि मन शांत ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आरटीई नोंदणीची स्थिती! ७९० शाळा देणार मोफत प्रवेश; आरटीई नोंदणीची उत्तम स्थिती, ८६११ जागा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री भुसे म्हणाले की, कष्ट, जिद्द आणि पालक-शिक्षकांच्या आशीर्वादाच्या बळावर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील आणि स्वतःबरोबरच राज्याचे नाव उज्ज्वल करतील. परीक्षा ही शेवट नसून नव्या संधींची सुरुवात आहे, असा सकारात्मक संदेश देत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Best wishes to the students from school education minister dadaji bhuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.